Mumbai Ajit Pawar : काय अल्टिमेटम द्यायचाय तो घरातल्यांना द्या, ही काही हुकूमशाही नाही; भोंग्यांवरून अजित पवारांनी दरडावलं

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अटी, नियमांचा भंग केल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, की कायद्यानुसार वागणाऱ्यांना नाही तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस दिली जाते. यातून कोणालाही माफी नाही, असे त्यांनी सांगितले.

Mumbai Ajit Pawar : काय अल्टिमेटम द्यायचाय तो घरातल्यांना द्या, ही काही हुकूमशाही नाही; भोंग्यांवरून अजित पवारांनी दरडावलं
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:31 AM

मुंबई : भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही नियमावली दिली आहे. त्यानुसार राज्यात परवानगी आहे. त्यामुळे कोणी अल्टिमेटम देणार असेल तर ते चालणार नाही. सर्व गोष्टी कायद्यानुसारच होणार. कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या. ही काही हुकूमशाही नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. काही मनसे कार्यकर्त्यांनी काल भोंग्यांच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी परवानगी नसताना महाआरती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अटी, नियमांचा भंग केल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, की कायद्यानुसार वागणाऱ्यांना नाही तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस दिली जाते. यातून कोणालाही माफी नाही, असे त्यांनी सांगितले.

‘कायदा हातात घेण्याचे धाडस कुणी करू नये’

कायदा हातात घेण्याचे धाडस कुणी करू नये. न्यायव्यवस्था जो वेळोवेळी निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी करणे सरकारला बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे राज्य कायद्यावर, संविधानाने चालते, अल्टिमेटमवर नाही. कोणताही राजकीय पक्ष असेल, त्याने असे वागणे योग्य नाही. निर्णय करायचा आहे, तो सर्वांनाच बंधनकारक असेल.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने 2005ला हा निर्णय दिला आहे. त्यानुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच ध्वनीक्षेपकाचा वापर करता येतो. रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर वापरता येत नाही. रमजान ईद तसेच अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातच्या भोंग्यांच्या परिस्थितीविषयीही त्यांनी माहिती दिली. तर महापुरुषांचे नाव आपण घेतो, त्यांच्या विचारावर आपण चालतो. त्यामुळे कायदा पाळा, असे आवाहन त्यांनी केले. तर आपल्या भागात आवाजाची मर्यादा पाळून भोंगे लावायचे असतील, तर आवश्यत ती परवानगी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. आवाहन करूनही परवानगी न घेतल्यास कारवाई अटळ आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाणे.

काय म्हणाले अजित पवार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.