Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP MLA Disqualification | जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न, अजित पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज साक्ष नोंदवण्यात येत आहे. या सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

NCP MLA Disqualification | जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न, अजित पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 2:56 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी पार पडत आहे. राहुल नार्वेकरांसमोर आजच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं. जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची आज साक्ष नोंदवण्यात येणार आहे. जयंत पाटील आज उलटसाक्ष नोंदवण्यासाठी स्वत:ची गाडी सोडून वकिलांसोबत विधीमंडळात दाखल झाले. शरद पवार गटाच्या वकिलांनी सुरुवातीला साक्ष नोंदवण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांकडून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची निवड 3 वर्षांसाठी होती. जयंत पाटील यांचा कार्यकाळ 2022 सालीच संपला, असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. सुमारे 3 वर्षांसाठी निवड असल्याने कार्यकाळ संपत नाही. पुढील निवडीपर्यंत किंवा निवडणूक होईपर्यंत कार्यकाळ सुरु राहतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. दुसरीकडे जयंत पाटील हे निवडून आलेले नव्हे तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. त्यावर जयंत पाटील यांनी मी निवडून आलेलो असल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच मला प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे पत्र प्रफुल्ल पटेल यांनी पाठवले, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

नेमके सवाल-जवाब काय?

शरद पवार गटाच्या वकिलांना जयंत पाटील यांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अजित पवार गटाच्या वकिलांकडून प्रश्न विचारण्यात आले.

शरद पवार गटाचे वकील – या प्रतिज्ञापत्रावर कुणी स्वाक्षरी केली आहे?

जयंत पाटील – मी

जयंत पाटील – या प्रतिज्ञापत्रात मला काही बदल करायचा आहे. परिच्छेद ३६ मधील पाचव्या ओळीत “मी अनिल भाईदास पाटील यांना कॉल केला होता” असे नमूद केले होते, त्याऐवजी “त्यांनी मला कॉल केला होता” असा बदल केला आहे.

अजित पवार गटाचे वकील – तुम्ही पक्षात कुठल्या पदावर होता, तुमची निवड कशी झाली?

पाटील – होय मी प्रदेश अध्यक्ष पदावर होतो, निवडणूक झाली आणि माझी निवड झाली. २०१८ साली निवडणूक झाली, त्यात माझी राज्य प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाली. २०२२मध्ये राज्य पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया सुरु होती. त्यात काही जिल्ह्यातील पदाधिकारी निवड झाली तर काही जिल्ह्यात ती सुरु होती. राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यातील पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर दिल्लीत नॅशनल कन्व्हेन्शन पार पडली. त्यात शरद पवार यांना कार्यालय निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले. इतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत मला माहिती नाही, पण माझ्या निवडीचे पत्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मला मिळाले.

वकील – याचा अर्थ तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आला नाहीत, तर तुमची निवड शरद पवार यांनी केली?

पाटील – कमिटीचा कार्यकाळ हा सुमारे ३ वर्षांचा असतो. त्यावेळी मी निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो. राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक सुरु होती. पण तोपर्यंत मी कमिटामार्फत निवडून आलेला प्रदेशाध्यक्ष होतो.

वकील – तुम्ही २०१८ पासून प्रदेशाध्यक्ष होता?

पाटील – मी सांगितले की सुमारे ३ वर्षांचा कमिटीचा कार्यकाळ असतो. फक्त ३ वर्षांचा असतो असे नाही. त्यामुळे राज्य पातळीवर निवडणूक पूर्ण होईपर्यंत ही कमिटी कार्यरत असते. तसेच माझी निवड प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम राहते.

वकील – २०२२ साली राज्य कमिटीची निवडणूक होईपर्यंत तुमची प्रदेशाध्यक्ष पदी निवड कुणी केली किंवा तुम्ही निवडून कसे आला?

पाटील – २०२२ नंतर जिल्हा कमिटीची निवडणूक झाली असे मी म्हटलं नाही. राज्य कमिटीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती, असे मी नमूद केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी माझी निवड प्रदेशाध्यक्ष पदावर झाल्याचे मला कळवले.

वकील – तुम्ही पाचव्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे

पाटील – माझे उत्तर योग्य आहे. माझी निवड ही फक्त ३ वर्षांपुरती नाही. ३ वर्षानंतर पु़ढील निवडणूक होईपर्यंत मी राज्य अध्यक्ष म्हणून काम करू शकतो.

वकील – तुमच्या मते २०२१ साली सुरु झालेली राज्य कमिटीची निवडणूक कधी संपली? की ती अजूनही सुरु आहे?

पाटील – प्रक्रिया सुरु आहे. काही लोक पक्षातून बाहेर पडले, त्यामुळे काही जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने सुरु आहे. त्यामुळे राज्य कमिटी निवडणूक घेता आलेली नाही.

वकील – राष्ट्रीय कमिटीची निवड कशी होते? निवडणुकीद्वारे की निवडीद्वारे?

पाटील – सर्व राज्यातील प्रतिनिधी राष्ट्रीय कमिटीचे सदस्य आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार यांची निवड करतात.

वकील – अर्थात सर्व राज्य कमिटीच्या निवडणूक झालेल्या नसतील तर घटनेप्रमाणे राष्ट्रीय कमिटीची स्थापना वैध ठरू शकत नाही, हे खरे आहे का?

(शरद पवार गटाच्या वकिलांनी या प्रश्नावर आक्षेप घेतला)

जयंत पाटील – मी असे म्हणालो नाही की सर्वच राज्यात निवडणुका सुरू होत्या. महाराष्ट्रात सुरू होत्या. त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. पक्षाच्या घटनेनुसार अस्तित्वात असेलेले सर्व पद त्या राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात.

वकील- या कार्यक्रम सर्व निवडणुकांना लागू होतो का?

जयंत पाटील- हा कार्यक्रम सर्व देशभरातील निवडणुकींसाठी लागू होता. पण त्यानंतर हा कार्यक्रम आधी एका पत्रानुसार पुढे ढकलण्यात आला.

वकील- यांना ते कागतपत्र दाखवा.. हेच ते पत्र आहे का ज्यांचा उल्लेख तुम्ही तुमच्या उत्तरात करत आहात का?

जयंत पाटील- मला नक्की आठवत नाही की हेच ते एकमेव पत्र आहे का?

वकिल- याच पत्राद्वारे फक्त राज्य कार्यकारीणीचे निवडणुक पुढे ढकलण्यात आली का?

जयंत पाटील- मी आधीच सांगितले आहे की मला नक्की आठवत नाही.

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.