Ajit Pawar | अजित पवार अ‌ॅक्शन मोडमध्ये, कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रथमच मंत्रालयात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली आहे. (Ajit Pawar Starts work after cured from corona )

Ajit Pawar | अजित पवार अ‌ॅक्शन मोडमध्ये, कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रथमच मंत्रालयात
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 1:37 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर अजित पवार पहिल्यांदाच‌ मंत्रालयात दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबूक लाईव्ह करत ही माहिती दिली आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले होते त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस अ‌ॅप स्टेटस ठेवत सर्वांचे आभार मानले होते. (Ajit Pawar Starts work after cured from corona )

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त 2 नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 7 दिवस आराम केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. अजित पवारांना 26 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. रुटीन चेकअपसाठी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते.

सात दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांना घरी सोडण्यात आले. यानंतरचे 7 दिवस विलगीकरणात राहिले. या कालावधीत अजित पवार यांनी कार्यालयीन कामकाज घरुनच केले. महत्वाच्या बैठकांनादेखील अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित राहिले होते.

दिलीप वळसे-पाटील कोरोनामुक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील कोरोनामुक्त झाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्सेस आणि सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानले आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलो आहे,अशा भावना दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांची कोरोना चाचणी 29 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते.

संबंधित बातम्या :

Ajit Pawar Corona : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Ajit Pawar Corona Recovery | उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, सुप्रिया सुळेंकडून डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे आभार

(Ajit Pawar Starts work after cured from corona )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.