केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; राजकीय धुळवडीची जोरदार चर्चा
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) आणि राज्याचे आदिवासी मंत्री अॅड के. सी. पाडवी (Adv. K. C. Padvi) यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
नाशिकः केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) आणि राज्याचे आदिवासी मंत्री अॅड के. सी. पाडवी (Adv. K. C. Padvi) यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Allegations between Union Minister Dr. Bharti Pawar and Minister of State Adv. K. C. Padvi)
अॅड पाडवी यांच्या कामाबद्दल त्यांच्याच सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील आदिवासी विभागाला जागे करण्याची गरज आहे, असे म्हणत डॉ. भारती पवार यांनी अॅड. के. सी. पाडवी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे, तर केंद्रीय राज्यमंत्र्यांना आपण केलेले काम पचनी पडत नाही. त्यामुळेच त्या माझ्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर अॅड पाडवी यांनी दिले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्याचे आदिवासी मंत्री पाडवी यांच्यावर आरोपांच्या अक्षरशः फैरी झाडल्या आहेत. डॉ. पवार म्हणाल्या की, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. पाडवी यांचे काम ठीक नाही. त्यांच्याविरोधात तक्रारींचा ढीग आपल्याकडे आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सरकारमधील लोकप्रतिनिधी या तक्रारी करण्यात आघाडीवर आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रसचे लोकप्रतिनिधी आहेत, असे म्हणत त्यांनी अॅड. पाडवी यांना लक्ष केले आहे. सोबतच पाडवी हे आदिवसी समाजाचे मंत्री आहेत. तरीही आदिवासी समाजाची कामे होत नाहीत. ते कुणाचेही फोन घेत नाही. लोकांना भेटण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ नसतो. खावटी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुमारी माता, आश्रमशाळांच्या प्रश्नाकडे प्रचंड दुर्लक्ष सुरू आहे. एकंदर राज्याच्या आदिवासी भागातील योजनांचे चांगभले झाले आहे. त्यामुळे या खात्याला जागे करण्याची गरजही डॉ. पवार यांनी व्यक्त केली आहे.
या आरोपांचे तितक्याच जोरकसपणे आदिवासी मंत्री अॅड. पाडवी यांनी खंडन करून डॉ. पवार यांच्यावर आरोप केले आहेत. डॉ. पवार या भाजपच्या. त्यामुळे त्यांचा त्रागा होत आहे. त्यांना आपले चांगले काम पाहावले जात नाही. खावटी कर्ज योजना भाजपमुळेच बंद पडली. डॉ. पवारांनी आपल्या खात्याकडे जास्त लक्ष द्यावे, म्हणजे आदिवासी बांधवांना त्याचा फायदा होईल. या कोरोनाकाळात सर्वात चांगले काम राज्याच्या आदिवासी विभागाने केले आहे. आम्ही विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान येथे अडकलेल्या आदिवासी बांधवांना आमच्या सरकारने आणि खात्याने घरी पोहचवले. त्यांच्यावर मोफत उपचार केले. भाजपने बंद पाडलेले खावटी अनुदान सुरू केले. त्याचा साडेबारा लाख कुटुंबांना फायदा झाला. माझे हेच काम डॉ. पवारांना पाहावत नाही.आमच्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी चुकीने तक्रारी केल्याची कबुली माझ्याकडे दिली आहे, असा दावाही त्यांनी केला.
अॅड पाडवी यांच्या कामाबद्दल त्यांच्याच सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील आदिवासी विभागाला जागे करण्याची गरज आहे. – डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री
डॉ. पवार या भाजपच्या. त्यामुळे त्यांचा त्रागा होत आहे. त्यांना आपले चांगले काम पाहावले जात नाही. खावटी कर्ज योजना भाजपमुळेच बंद पडली. डॉ. पवारांनी आपल्या खात्याकडे जास्त लक्ष द्यावे. – अॅड. के. सी. पाडवी ( Allegations between Union Minister Dr. Bharti Pawar and Minister of State Adv. K. C. Padvi)
इतर बातम्याः
पुढच्या वर्षी लवकर याः नाशिककरांना येथे करता येईल बाप्पांचे विसर्जन!