Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातील घाण गेली… विरोधी पक्षातील दोन बड्या नेत्यांची जहरी टीका; कोण म्हणालं असं?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले.

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातील घाण गेली... विरोधी पक्षातील दोन बड्या नेत्यांची जहरी टीका; कोण म्हणालं असं?
bhagat singh koshyariImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 11:04 AM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महापुरुषांचा वांरवार अवमान केल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात जनक्षोभ होता. त्यांच्या विरोधात मोर्चेही काढण्यात आले होते. त्यांचे पुतळेही जाळण्यात आले होते. त्याची दखल घेत केंद्र सरकारने अखेर राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची घाण गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली आहे. राज्यपालांनी आधीच जायला हवं होतं. ते वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक विधान करत होते. मराठी माणसांच्या विरोधातही त्यांनी विधाने केली होती. महाराष्ट्राचा अवमान करण्यासाठीच राज्यपालांना पाठवलं होतं की काय अशी परिस्थिती होती, असं अंबादास दानवे म्हणाले.

आभार मानणार नाही

आम्ही मोर्चाही काढला होता. अधिवेशनात आवाजही उठवला होता. भाजपने म्हणावं किंवा केंद्राने महाराष्ट्राचा अवमान करण्यासाठी, जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्यासाठी लोकांचं जनमत असतानाही त्यांना जास्त दिवस ठेवलं. पण त्यात आता त्यांनी दुरुस्ती केली आहे. मी त्यांचे आभारही मानणार नाही आणि अभिनंदनही करणार नाही. खरं तर महाराष्ट्रातील घाण गेली असंच म्हणेल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

इज्जत वाचवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

आनंदाची बाब

राज्यपालांचा राजीनामा झाला आहे अतिशय आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालाचा राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केला हे बरं झालं. राज्यपाल राष्ट्रपुरुषांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होते. आता नवीन राज्यपाल आले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

राज्यपाल कसा नसावा

महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंह कोश्यारी आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.