Ambani Bomb Scare Case: सचिन वाझेंनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; NIA चा मोठा खुलासा

याप्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते. | Sachin Vaze NIA

Ambani Bomb Scare Case: सचिन वाझेंनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट का रचला; NIA चा मोठा खुलासा
सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:04 AM

मुंबई: ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झाल्याने गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी आणि स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट रचल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘एनआयए’कडून सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला बरीच माहिती दिली आहे. (Sachin Vaze introgation by NIA)

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती. त्यामुळे सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर याप्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, एनआयएला सचिन वाझे यांच्या थिअरीवर विश्वास नसल्याचेही समजते.

काय आहे प्रकरण?

2 डिसेंबर 2002मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटाही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

निकाल काय लागला?

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचं एका साक्षीदाराने कोर्टाला सांगितलं होतं. या प्रकरणी एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं होतं. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. दरम्यान, 2018 नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला

(Sachin Vaze introgation by NIA)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.