AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांनी मुंबईत दाखल होताच माणुसकी जपली, आता सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, रात्र महत्त्वाची

अमित शाह यांचं विमान खरंतर आज संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबई विमानतळावर लँड होणार होतं. पण अमित शाह यांना येण्यास एक तास उशिर झाला. ते रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याला उशिर झाला असताना त्यांनी एक माणुसकी जपणारी कृती केली.

अमित शाह यांनी मुंबईत दाखल होताच माणुसकी जपली, आता सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, रात्र महत्त्वाची
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 9:02 PM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल झाले. अमित शाह यांच्या हस्ते उद्या निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दुसरीकडे अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. या बैठकांमध्ये आगामी मुंबई महापालिका निवडणूक, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र भाजपसाठी आजची रात्र अतिशय महत्त्वाची आहे. कारण आगामी राजकीय वाटचालींसाठी आजची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. असं असताना अमित शाह यांच्याकडून मुंबईत दाखल होताच माणुसकीचं दर्शन बघायला मिळालं आहे.

अमित शाह यांचं विमान खरंतर आज संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबई विमानतळावर लँड होणार होतं. पण अमित शाह यांना येण्यास एक तास उशिर झाला. ते रात्री आठ वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते मुंबई विमानतळावर गेले होते. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान अमित शाह यांनी माणुसकी जपणारी कृती केली.

अमित शाह यांनी तावडे कुटुंबाची सात्वनपर भेट घेतली

अमित शाह यांच्या दौऱ्याला एक तास उशिर झाला असला तरी त्यांनी त्याची पर्वा न करता सर्वात आधी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. विनोद तावडे हे सध्या केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत आहेत. पण दोन दिवसांपूर्वी विनोद तावडे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तावडे यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे अमित शाह मुंबईत दाखल होताच विनोद तावडे यांच्या घरी गेले. त्यांनी तावडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेला निघाले.

हे सुद्धा वाचा

सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर आज रात्री महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर भाजपची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा द्यायच्या याबाबत चर्चा होऊ शकते. तसेच या निवडणुकीत मनसे सोबत युती करायची का, तसेच आणि कोणत्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची भाजपची बैठक महत्त्वाची मानली जातेय.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.