तुम्हाला अॅक्सिस बँकेने प्रमोशन का दिले, किती फायदा करुन दिलात; अमृता फडणवीस म्हणाल्या…
अमृता फडणवीस यांनी तुम्ही प्रत्येकवेळी माझ्या निष्ठेवर प्रश्न का उपस्थित करता, असा सवाल विचारला. | Amruta Fadnavis
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका युजरने अमृता फडणवीस यांच्यामुळे राज्य सरकारने अॅक्सिस बँकेचा फायदा करुन दिला, असा अप्रत्यक्ष आरोप केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी तुम्ही प्रत्येकवेळी माझ्या नोकरीवर प्रश्न का उपस्थित करता, असा प्रतिसवाल विचारला. (Amruta Fadnavis slams twitter user over)
प्रत्येकवेळी अॅक्सिस बँकेतील माझ्या नोकरीचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खात्यांचा संबंध का जोडला जातो. मी 18 वर्षांपासून अॅक्सिस बँकेत कार्यरत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अॅक्सिस बँकेत का आहेत, हा प्रश्न तुम्ही कधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारलात का, अशी विचारणाही अमृता फडणवीस यांनी केली.
Why does every argument lead to my 18 years job with Axis Bank & Police salary accounts with the bank ? Have you ever asked @CPMumbaiPolice or other senior Police officials – since how many years they are having salary accounts with Axis Bank (erstwhile UTI Bank ) ? https://t.co/HhszI8jBNZ
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 26, 2021
‘सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांचा जंगलातील जमिनीवर बंगला’
आरेतील जंगल वाचवण्यासाठी मेट्रोची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी अलिबागमध्ये वन जमिनीच्या हद्दीत बंगला बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई (अलिबाग) येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते.
किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता यांनी रिट्विट करत त्यावर विशेष टिप्पणी केली आहे. सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा
किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर
(Amruta Fadnavis slams twitter user over)