मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या पक्षातील नेते ऐकत नाही…महायुतीकडून शिवसेनेला घरचा आहेर
lok sabha election 2024: शिवतारे अजित दादांबद्दल बारामतीत महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत, तिथे महायुतीचा पाळणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला.
ठाणे | 20 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढली. त्यानंतरही विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाहीत, असे चित्र जात आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे ऐकत नाहीत, असा घरचा आहेर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी केले. शिवतारे अजित दादांबद्दल बारामतीत महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत, तिथे महायुतीचा पाळणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.
महायुतीचा धर्म पाळावा
आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल, असे कृत्य करायचे नाही. परंतु सातत्याने विजय शिवतरे हे कृत्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या पक्षातील नेते ऐकत नाही, असे मेसेज जात आहे. आम्ही 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म पाळत आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे शक्ती स्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान असणाऱ्या बारामतीमध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बारामतीमध्ये प्रचार सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील समन्वय रहावा म्हणून बैठका घेतल्या. परंतु शिवतारे हा महायुतीच्या दुधात मीठाचा खडा टाकत आहे. पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ मध्ये दाखवली होती. अजित दादांच्या उमेदवाराचा सर्वाधिक मतांनी विजय झाला होता.
कल्याणमध्ये महायुतीचा प्रचार
कल्याण मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभ रहावे त्याची भावना असणं स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यामुळे त्यांनी ठिकाणी असणारे भाजपचे लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नाही, असे आनंद पराजंपे यांनी यांनी सांगितले. मात्र महायुतीचे नेते जो निर्णय देतील त्याला विजय करण्याकरिता आपण प्रयत्न करू, हे त्यांनी स्पष्ट केले.