Anil Deshmukh : चांदीवाल आयोगाची अनिल देशमुखांना क्लिनचीट? मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर, परमबीरसिंगांचे आरोप खोटे?
परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा अहवाल चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) दिला आहे. अशी माहिती आता समोर आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि परमबीर सिंह (Parambir Singh) वादात एक मोठी अपडेट आलीय. ज्या परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुखांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्या परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा अहवाल चांदीवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) दिला आहे. अशी माहिती आता समोर आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख हे परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे जेलमध्ये आहेत. या प्रकरणाने राज्याचे राजकारण हादरवून सोडले आहे. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडल्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण थेट अनिल देशमुखांच्या अटकेपर्यंत पोहोचले. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिल्याला वसुलीचे टार्गेट दिल्याचा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे.
आयोग अहवाल सादर करताना
प्रकरण नेमकं काय?
सर्वात आधी या प्रकरणाला सुरूवात झाली ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडली तिथून. या प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाली. मात्र सचिन वाझेच्या पोलीस दलातील समावेशावरून आणि त्याला मिळणाऱ्या आदेशावरून अनेक सवाल उपस्थित झाले. त्यानंतर थेट अनिल देशमुखांना सवालाच्या घेऱ्यात उभे केल्यानंतर अनिल देशमुखांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी देशमुखांनी वाझेला वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटरबॉम्ब टाकला आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मात्र ही वसूलीही महिन्याला 100 कोटी असल्याचे सांगण्यात आले.
परमबीर यांच्या आरोपानंतरच देशमुख अडचणीत
अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी आणखीही काही गंभीर आरोप केले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले. अनिल देशमुकांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सीबीआयच्या अनेक धाडी देशमुखांच्या घरी पडल्या आणि शेवटी चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. त्याचदरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग नेमण्यात आला.
चादीवाल आयोगाची देशमुकांना क्लिनचिट?
अनेक महिने चौकशी आणि या प्रकरणात अनेक जबाब नोंदवल्यानंतर चांदिवाल आयोगाने या प्रकरणात परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेले आरोप खोटे असल्याचा अहवाल दिल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता तरी अनिल देशमुखांना दिलासा मिळणार का? या अहवालाचा या प्रकरणावर मोठा परिणाम होणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र सध्या तरी ही सुत्रांकडून अनिल देशमुखांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.