Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून वेगवान तपास, 12 बड्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं (ED) बारा आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण केलीय.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं (ED) बारा आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण केलीय. पोलीस दलातील बदली प्रकरणात ईडीने ही चौकशी केली आहे. गेल्या आठवड्याभरात ही चौकशी केली आहे. 12 पैकी काही अधिकारी आयपीएस आहेत तर काही अधिकारी हे मपोसे अर्थात महाराष्ट्र पोलीस सेवेतील आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख यांची दोन मुद्यावंर चौकशी
ईडीकडून अनिल देशमुख यांची दोन मुद्यावर चौकशी सुरू आहे. एक मुद्दा बार मालका कडून 100 कोटी रुपये उकळण्या बाबतचा आहे तर दुसरा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आहे. बार मालकांकडून चार कोटी वीस लाख रुपये घेतल्याच तपासात उघड झालं आहे. यामुळे ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली तसच त्यांची मालमत्ता ही जप्त केली आहे. मात्र,कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. त्यांची नाव आणि पद काय आहे त्यांनी बदलीसाठी किती पैसे दिलेत हे उघड होत नव्हतं.
बदल्यांमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा ईडीला संशय
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे. बदलाच्या माध्यमातून मिळालेले हे पैसे ही मनी लाँडरिंग केल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. मात्र , त्यांना अधिकाऱ्यांची लिस्ट उपलब्ध होत नव्हती.
सांगलीच्या व्यक्तीकडं सापडली लिस्ट
अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आहे. या गुन्ह्यात सीबीआयने सांगली येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे पोलीस उपायुक्त दर्जाच्या आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांच्या नावांची लिस्ट सापडली होती ही लिस्ट बदल्या बाबतची होती. ही लिस्ट ईडीच्या अधिकाऱ्यांनी मिळवली.
लिस्टमधील अधिकाऱ्यांची चौकशी
सीबीआयला मिळालेल्या त्या लिस्ट मध्ये असलेल्या बारा आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांना बोलावून त्याचे जबाब गेल्या काही दिवसात नोंदवले आहेत. ईडीला अनिल देशमुख यांच्या विरोधातील तपास लवकरच संपवायचा आहे. त्या अनुषंगाने या आयपीएस आणि मपोसे अधिकाऱ्यांचा जबाब तात्काळ घेण्यात आला आहे.
इतर बातम्या:
Anil Deshmukh Money Laundering case ED complete investigation and enquiry of 12 police officer