100 कोटींची महावसुली 300 कोटींवर?, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी

राज्य सरकारची वसुली आधी 100 कोटीची होती. आता ही वसुली 300 कोटींवर गेली आहे. (anil parab should resigns on corruption in transport department, says sandeep deshpande)

100 कोटींची महावसुली 300 कोटींवर?, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा; मनसेची मागणी
sandeep deshpande
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 11:09 AM

मुंबई: राज्य सरकारची वसुली आधी 100 कोटीची होती. आता ही वसुली 300 कोटींवर गेली आहे. परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. (anil parab should resigns on corruption in transport department, says sandeep deshpande)

गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.

आरोप काय?

पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.

संदीप देशपांडेंचा आरोप

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. परिवहन विभागात देखील पैसे वसुली सुरू आहे. परिवहन विभागाच्या वाहन निरीक्षकानेच त्याचं बिंग फोडलं आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात थेट अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा नाशिकच्या क्राईम ब्रँचने तपास सुरू केला आहे. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. परंतु, या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी चौकशी करावी

संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. 100 कोटीची महावसूली आता 300 कोटीवर? परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?, असा सवाल देशपांडे यांनी ट्विटमधून केला आहे. (anil parab should resigns on corruption in transport department, says sandeep deshpande)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या

Maharashtra News LIVE Update | मालेगावात अज्ञात वाहनाची कोंबड्या घेऊन गाडीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

(anil parab should resigns on corruption in transport department, says sandeep deshpande)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.