निकाल अध्यक्षांनी लिहिला की कोणी…अंजली दमानिया यांना काय म्हणायचं…

शिवसेनेसंदर्भात निकाल बुधवारी आल्यानंतर दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित करत आरोप केले आहे. यासंदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटची चांगली चर्चा सुरु झाली आहे.

निकाल अध्यक्षांनी लिहिला की कोणी...अंजली दमानिया यांना काय म्हणायचं...
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 10:35 AM

मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात बुधवारी निकाल दिला. निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचे म्हटले. त्यासाठी त्यांनी शिवसेनेची २०१८ मधील घटना अमान्य केली. त्याचवेळी दोन्ही गटापैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत आरोप केले आहे. तसेच त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत ? कोणी ड्राफ्ट केलं? सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी ? असे प्रश्न उपस्थित केले होते.

काय म्हटले अंजिल दमानिया यांनी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राचा महानिकाल वाचून दाखवला. निकाल वाचत असताना संपूर्ण निकाल मी स्वतः लाईव्ह पाहिला. त्यावेळी मला काही प्रश्न पडले. महाराष्ट्राच्या महानिकालाच इंग्रजीत वाचन का? मला वाटले की सुरवातीचे पाच मिनिटे इंग्रजीत असावीत. परंतु पूर्णच निकाल इंग्रजीत दिला. अध्यक्ष निकाल वाचताना अडखळत देखील होते. तेव्हा मला वाटतंय की निकाल स्वतः अध्यक्ष यांनी लिहिला होता की त्यांना कोणी ड्राफ्ट बनवून दिला होता. अध्यक्ष ज्या ठिकाणी अडखळत होते त्याबद्दल त्यांना जर आज जरी विचारलं तरी त्यांना नीट उत्तर देता येणार नाहीत. निकालातील प्रश्नावर ते उत्तर देऊ शकणार नाही. निकालात त्यांचे शब्द नव्हते.

हे सुद्धा वाचा

निकाल इंग्रजीत का

महाराष्ट्राचा महानिकाल चक्क इंग्रजीत का? असा प्रश्न निर्माण करत अंजली दमानिया यांनी त्याचे उत्तर दिले. हा निकाल सुप्रीम कोर्टाच्या तुषार मेहतांनी यांनी लिहून दिल्याची शंका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे. निकाल लिहिणारे नक्कीच कोणीतरी सुप्रीम कोर्टाचे वकील असतील. राहुल नार्वेकर यांनी फक्त वाचण्याचे काम केले. इंग्रजीत का वाचलं? कारण त्याचे मराठीत भाषांतर येत नसावे. विधानसभा अध्यक्षांना त्यातले धड शब्द पण वाचता येत नव्हते.

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटवर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांनी अंजली दमानिया यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायलयाकडून त्यांना दिलासा मिळणार की काय? याकडे लक्ष लागले आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.