“आत्मसंरक्षणासाठी एन्काऊंटर? आम्ही वेडे आहोत का? गृहमंत्री राजीनामा द्या”

आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याने खळबळ उडालीय. पोलीस घेऊन जात असताना आरोपी पिस्तुल घेऊन तो तीन राऊंड फायर करतो, तोपर्यंत पोलीस पाहत काय करत होते? असा सवाल केला जात आहे. या घटनेनंतर गृहमंत्री राजीनाम्याची मागणी केली आहे.

आत्मसंरक्षणासाठी एन्काऊंटर? आम्ही वेडे आहोत का? गृहमंत्री राजीनामा द्या
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 12:14 AM

बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. आरोपी अक्षय याने पोलिसांच्या गाडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राउंड फायर केले. त्यावेळी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचं पोलीस सांगत आहेत. मात्र विरोधकांनी पोलिसांवरच टीका केली हे सर्व षडयंत्र असल्याचं म्हणत अक्षय शिंदचा ठरवून एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर आरोप करत त्यांनी पैसे घेऊन मुलाला मारल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अतिशय धक्कादायक, आत्मसंरक्षणासाठी एनकाउंटर? API मोरेच्या पायावर गोळ्या झाडल्या, मग अक्षय शिंदेच्या पायावर का गोळ्या मारण्यात आल्या नाहीत? आम्ही वेडे आहोत का? लोकांना मूर्ख समजले आहे का? आता मात्र हद्द झाली. गृह मंत्र्यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे अक्षय शिंदेवर सगळ्यात कठोर शिक्षा व्हायला हवी होतीच, पण एनकाउंटर हे नेहमी सत्य लपवण्यासाठीच केले जातात, असं म्हणत अंजली दमानिया यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

शाळेच्या प्रशासनाचे गायब लोक कुठे आहेत ? कोतवाल आणि आपटे कुठे आहेत? आज पर्यंत गायब आहे हे पटते का? जर हे निर्दोष आहेत तर ते अजून फरार कशामुळे आहेत? सत्य लपवले जात आहे का? आज सरन्यायाधीश चंद्रचूड मुंबईत आहे त्यांनी ताबडतोब Suo Moto दाखल घेऊन चौकशीचे आदेश दिले पाहिजे,  अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.