‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील

चहा विक्रेत्याला 'कोरोना'शी संबंधित त्रास आहे का, हे अद्याप स्पष्ट नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घाबरुन जाऊ नये (Area around Matoshree sealed)

'मातोश्री'जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडली, खबरदारीसाठी परिसर सील
Follow us
| Updated on: Apr 06, 2020 | 5:03 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या आसपासचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. ‘मातोश्री’ परिसरात असलेल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीची तक्रार जाणवू लागल्याने खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत. (Area around Matoshree sealed)

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे. ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीचा त्रास झाल्याने संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.

या चहा विक्रेत्याला ‘कोरोना’शी संबंधित त्रास आहे का, हे अद्याप स्पष्ट नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कलानगर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये मोडतो. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभाग गंभीर प्रकारात मोडतो. इथे आतापर्यंत 25 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासोबतच ‘वर्षा’ हे सरकारी निवासस्थानही गंभीर विभागामध्ये मोडते.

हेही वाचा : मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. ‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. (Area around Matoshree sealed)

‘जी दक्षिण’मध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ‘ई’ वॉर्डमध्ये 44 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. ‘ई’ वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर या भागांचा समावेश होतो. काल रुग्णांची वाढ झाल्यामुळे हा भाग पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला.

‘के पूर्व’ आणि वांद्रे-कलानगर असलेला ‘एच पूर्व’ या विभागांमध्ये फक्त एका रुग्णाचा फरक आहे. एखादा रुग्ण वाढला, तर कलानगर असलेला विभाग टॉप 5 मध्ये जाईल.

(Area around Matoshree sealed)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.