नववीत असताना अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले, गोस्वामींच्या अटकेने करवाचौथला फळ, अक्षता नाईक गदगदल्या
अर्णव गोस्वामी सूडबुद्धीने वागले, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते, असे अक्षता नाईक म्हणाल्या
मुंबई : वयाच्या चौदाव्या वर्षी नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, आज करवाचौथला त्याचं फळ मिळालं, अशा भावना अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली. (Arnab Goswami arrest Anavay Naik’s wife Akshata Naik tells her story after husband suicide)
“गाडीवर दोन बाटल्या फेकून मारल्या, तर त्रास होतो. माझ्या घरातील दोन प्रियजन गेले आहेत. नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, वयाच्या चौदाव्या वर्षी. माझा जीव तुटणार नाही का? आज करवाचौथ आहे, हे (गोस्वामींची अटक) त्याचंच फळ आहे” अशा भावना अक्षता नाईक यांनी बोलून दाखवल्या.
माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या.
अर्णव गोस्वामींसारखी माणसं काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते, 83 लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून चार कोटी, इतरांकडून येणं होतं, पण तेही देऊ नका असे अर्णवने सांगितल्याचा दावा अक्षता नाईक यांनी केला.
आम्ही जगायचं नाही का, फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही, असंही अक्षता नाईक म्हणाल्या.
सुशांतसिंहबाबत एवढं सांगत होतो, त्यावेळी माझ्या पतीने त्याचं नाव सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलं आहे, तरीही कारवाई झाली नाही. मला महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील लोकं सपोर्ट करतील असा मला विश्वास आहे. भारतातील लोकांनी सत्याचे समर्थन केले पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आमचं प्रकरणं भटकवण्याचा प्रयत्न झाला आहे, मोदींनाही पत्र लिहिलं होतं, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण काय?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी अर्णव गोस्वामींना अटक केली. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. (Arnab Goswami arrest Anavay Naik’s wife Akshata Naik tells her story after husband suicide)
कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. अर्णव गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.
अन्वय यांनी त्यांच्या आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावं लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/CR2YRVGIHx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020
संबंधित बातम्या :
हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष इशारा
‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना अटक
(Arnab Goswami arrest Anavay Naik’s wife Akshata Naik tells her story after husband suicide)