अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न लागलं. (Arun Gawli Daughter Yogita Gawli Actor Akshay Waghmare Wedding)

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना 'डॅडी' भावूक
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 4:54 PM

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी आज (शुक्रवार 8 मे) विवाहबद्ध झाली. कन्यादान करताना ‘डॅडी’ अरुण गवळी भावूक झाल्याचं दिसत होतं. (Arun Gawli Daughter Yogita Gawli Actor Akshay Waghmare Wedding)

लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. अक्षय आणि योगिता यांचं लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच झालं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न लागलं.

पहा फोटो : अरुण गवळीच्या मुलीला हळद लागली, नवरदेवाच्या हातावर मेहंदी

काल संध्याकाळी दोघांना हळद लागली. रीतीप्रमाणे नवरदेव अक्षय वाघमारेने हातावर मेहंदी लावली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.

लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याची माहिती आहे. फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी होती.

अक्षय वाघमारेने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकतीच ‘ती फुलराणी’ या मालिकेतील त्याची भूमिका गाजली होती. अक्षय त्याच्या फिटनेस व्हिडिओसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळातही तो व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहे.

डॉन अरुण गवळी सध्या पॅरोलवर बाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.

लॉकअपमधून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे. काही आठवड्यापूर्वी कॅरम खेळतानाचा त्याचा व्हिडीओ जावई अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला होता.

(Arun Gawli Daughter Yogita Gawli Actor Akshay Waghmare Wedding)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.