AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan case : आर्यन खानला पासपोर्ट परत द्या, स्पेशल कोर्टाचे एनसीबीला आदेश

दीड महिन्यापूर्वी आर्यनला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. पुढे आर्यन खानने पासपोर्ट (Passport) परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. अखेर आज स्पेशल कोर्टाने एनसीबीला आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत.

Aryan Khan case : आर्यन खानला पासपोर्ट परत द्या, स्पेशल कोर्टाचे एनसीबीला आदेश
आर्यन खानImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 5:28 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर 1 जुलै रोजी आर्यन खानने विशेष एनडीपीएस कोर्टासमोर याचिका दाखल केली होती. त्यात त्याने पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती. आर्यन खानला मागील वर्षी क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने अटक केली होती. साधारण दीड महिन्यापूर्वी आर्यनला या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. पुढे आर्यन खानने पासपोर्ट (Passport) परत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. अखेर आज स्पेशल कोर्टाने एनसीबीला आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत.

जामिनाच्या अटींवर पासपोर्ट जमा

एनसीबीने आर्यन खान आणि इतर पाच जणांना पुरेशा पुराव्याअभावी क्लिन चिट दिली. आर्यन खानने जामिनाच्या अटींनुसार कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. गुरुवारी त्याने त्याच्या वकिलांच्या मार्फत विशेष कोर्टात याचिका दाखल केली. ज्यामध्ये त्याचं नाव नसलेल्या आरोपपत्राचा हवाला देत पासपोर्ट परत करण्याची मागणी केली होती.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी 27 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता शाहरुख खानचा आर्यन खान आणि इतर पाच जणांना दोषमुक्त केलं. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. याप्रकरणी आता 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं. एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर आर्यनसह इतर सहा जणांना अटक केली होती. आर्यनने जवळपास एक महिना तुरुंगात घालवला होता. एनसीबीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. आर्यनला या प्रकरणात गोवण्यात आलं असावं आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला असावा, असा आरोपही झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला होता.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.