VIDEO: कोण आहे प्रभाकर साईल ज्याच्या आरोपानं समीर वानखेडेसह एनसीबीही गोत्यात आलीय?

एनसीबीकडून ड्रग्जप्रकरणी केलेल्या कारवायांमध्ये तोडपाणी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईल यांनीच हा गौप्यस्फोट केल्याने एनसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत. (Aryan Khan Drug Case: who is prabhakar sail?)

VIDEO: कोण आहे प्रभाकर साईल ज्याच्या आरोपानं समीर वानखेडेसह एनसीबीही गोत्यात आलीय?
prabhakar sail
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 4:28 PM

मुंबई: एनसीबीकडून ड्रग्जप्रकरणी केलेल्या कारवायांमध्ये तोडपाणी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईल यांनीच हा गौप्यस्फोट केल्याने एनसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रभाकर साईल यांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि शिवसेना नेते संजय राऊत हे आक्रमक झाले असून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. मात्र, एनसीबीने अडचणीत आणलेले हे प्रभाकर साईल कोण आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश.

कोण आहेत प्रभाकर साईल?

प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं होतं.

साईल यांचे आरोप काय?

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगा दिल्या

त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

गोसावी गायब

क्रुझवरील धाडसत्राच्या रात्री आपण गोसावी सोबतच होतो. गोसावी आणि सॅम यांना एनसीबीच्या कार्यालयाबाहेर एकत्र पाहिल्याचा दावाही त्यांनी केला. गोसावी नाट्यमयरित्या गायब झाला आहे. त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

रंगेल राजाचे 5000 महिलांशी लैंगिक संबंध, फीमेल हार्मोन्स शरीरात सोडून राजाला केलं ‘शांत’!

(Aryan Khan Drug Case: who is prabhakar sail?)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.