AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश, आर्य खान ड्रग्ज प्रकरण भोवलं, क्लीनचिट मिळाल्यावर सरकार आक्रमक

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीला क्रूझवर टाकलेल्या छाप्याच्या कारवाईत, अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंखअयाक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे देण्यात आला होता.

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंवर कारवाईचे आदेश, आर्य खान ड्रग्ज प्रकरण भोवलं, क्लीनचिट मिळाल्यावर सरकार आक्रमक
आर्यनला जाणीवपूर्व गोवण्यात आले, एसआयटीचा रिपोर्ट Image Credit source: tv9
| Updated on: May 27, 2022 | 3:59 PM
Share

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता आर्यन खानला आरोप करणारे एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरच कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. कारण ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली आहे. आज या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे नवे आरोपपत्र समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समीर वानखेडे यांची भूमिका आता वादात सापडली आहे. या आरोपपत्रानुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीला क्रूझवर टाकलेल्या छाप्याच्या कारवाईत, अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंखअयाक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे देण्यात आला होता.

वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

यापूर्वी एसआयटीच्या चौकशी अहवालातही मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या वानखेडे यांना एनसीबीतून हटवण्यात आले असून त्यांची रवानगी त्यांचे मूळ केडर असलेल्या डीआरआयमध्ये करण्यात आलेली आहे. या एसआयटीच्या तपासात अनेकदा समीर वानखेडे यांची साक्षही नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणात एसआयटीने या प्रकरणातील आरोपी, साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीही नोंदवलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण गाजत होतं. देशभर या प्रकरणाची चर्चा होती. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खान याचाच मुलगा अशा प्रकरणात अडकल्याने देशभर या प्रकरणाने खळबळ माजवली होती.

नवाब मलिक यांचे आरोप काय होते?

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे पक्षपातातून या कारवाई करत आहेत अरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच मलिक यांच्या जावयाला वानखेडे यांनी अटक केल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे हे खोटे जात प्रमाणपत्र देऊन भरती झाल्याचा आरोप मलिकांकडून करण्यात आला होता. समीवर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक यांच्याकडून करण्यात आला होता. तशी कागदपत्रेही मलिक यांच्याकडून दाखवण्यात आली होती. तर त्यानंतर वानखेडे यांनीही आपली जातप्रमाणपत्रे दाखवत सर्व आरोप फेटाळून लावले होते. हा वादही राज्याच्या राजकारणात बराच चर्चेत राहिला होता. आता आर्यन खान अटक आणि ड्रग्ज केस प्रकरण आता समीर वानखेडे यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. आता प्रकरणात वानखेडे यांचा पाय किती खोलात जातो हे लवकरच कळेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.