MVA: माकडांच्या उड्या सुरु आहेत, महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्यावर ओवैसी म्हणतात, बघवत नाही पण बघावं लागतंय
या सत्तानाट्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी माकडाच्या उड्या आहेत या फांदीवरून त्या फांदीवर म्हणत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा माहाविकास आघाडीचा प्रश्न आहे म्हणत यावर बोलण्यासही नकार दिला आहे.
मुंबई : राज्यातलं सत्तानाट्य पाहिल्यावर अनेकांना रामायम आणि महाभारत आठवायला लागलंय. कारण शिवसेनेत (Shivsena) पुन्हा एकदा सर्वात मोठं बंड झालंय. मात्र एकनाथ शिंदेंच्या या बंडानं (Eknath Shinde) महाविकास आघाडी सरकारच अडचणीत आणलंय. आमच्याकडे पूर्ण संख्यावळ आहे. आमचं सरकार स्थिर आहे. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू असे दावे जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत असले. तरीही याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. दुसरीकडे शिंदे गट हा आपल्याला वेगळ गट म्हणून मान्यता द्यावी यासाठी धावाधाव करतोय. तर भाजपसोबत सत्तास्थापनेची खलबतं सुरू आहे. मात्र या सत्तानाट्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी माकडाच्या उड्या आहेत या फांदीवरून त्या फांदीवर म्हणत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा माहाविकास आघाडीचा प्रश्न आहे म्हणत यावर बोलण्यासही नकार दिला आहे.
ओवैसी काय म्हणाले? पाहा
देखा नहीं जाता मगर देख रहा हूँ… #MaharashtraPolitcalCrisis #Maharashtra pic.twitter.com/6o295DXwqq
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 25, 2022
बघवत नाही पण बघतोय…
या बंडाआधी एमआयएमवर महाविकास आघाडीचे बी टीम आहे, शिवसेनेची ही बी टीम आहे. अशी थेट टीका झाली आहे. तसेच एमआयएमकडूनही युतीचे प्रस्ताव याआधी ठेवले गेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आणि विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीलाच उघड पाठिंबा हा एमआयएमने दिला आहे. आता मात्र या बंडानंतर एमआयएमही हे त्यांचं ते बघून घेतील म्हणत सावध भूमिकेत आली आहे. एमआयएमवर आधी भाजपची बी टीम आहे, अशीही टीका झाली आहे.
महाविकास आघाडी बघून घेईल
सध्याच्या परिस्थितीबाबत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, सध्या माकडांच्या या फांदीवरून त्या फांदीवर उद्या सुरू आहेत. मला याबाबतीत काही बोलायचं नाही. याबाबत महाविकास आघाडी बघेल. त्यांचं ते ठरवतील काय करायचं. आमदारांनी परत यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. तसेच हे शिवसेनेने ठरवालं. मी छोटा नेता आहे मी एवढा मोठा नेते नाही. त्यामुळे मला काही बोलायचं नाही. एखलाख का जलता हुआ घर देख राहा हूँ, देखा नहीं जाता मगर देख राहा हूँ, अशी शेरोशायरीही यावेळी ओवैसी यांनी केली आहे. त्यामुळे ओवैसींची ही सावध भूमिका काय सांगते. तसेच राज्याच्या राजकारण एमआयएम ही कुणाबरोबर जाणार? हाही सवाल अद्याप तरी अनुत्तरीतच आहे.