कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल

सत्य जे काय आहे ते संबंधित एजन्सी समोर आणतीलच. त्यांच्या वतीने बोलण्याचा मला अधिकार नाही. ते योग्यही होणार नाही. पण जर कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्याची झाली असेल तर 40 हजार कोटी रुपये ज्या अर्थसंकल्पाचे खर्च होतात, तो कर भूमिपुत्रांनीच दिलेला आहे.

कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल
कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हाच शिवसेनेचा कार्यक्रम; आशिष शेलारांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 4:56 PM

मुंबई: सत्य जे काय आहे ते संबंधित एजन्सी समोर आणतीलच. त्यांच्या वतीने बोलण्याचा मला अधिकार नाही. ते योग्यही होणार नाही. पण जर कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) घोटाळ्याची झाली असेल तर 40 हजार कोटी रुपये ज्या अर्थसंकल्पाचे खर्च होतात, तो कर भूमिपुत्रांनीच दिलेला आहे. त्याचा हिशोब भूमिपुत्रांनीच मागितला आहे. भूमिपुत्रांच्या पैशावर तुमचे जे इमले उभे राहिले, भूमिपुत्रांच्या पैशावर भ्रष्टाचाराचे मजले तुम्ही बांधले, त्या विरोधात खरी भूमिपुत्रांची लढाई आहे. भाजप ही भूमीपुत्रांचीच लढाई लढते आहे. तर कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हा महापौर आणि शिवसेनेचा कार्यक्रम आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (ashish shelar) यांनी केली. शेलार यांनी भाजपच्या (bjp) प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.

आशिष शेलार यांनी या पत्रकार परिषदेत आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीची माहिती दिली. ही बैठक नियोजित असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व कोअर कमिटीचे सदस्य आज अतिशय राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर आणि संघटनेच्या अति महत्त्वाच्या बाबींवर आज जवळजवळ पूर्ण दिवस या बैठकत चर्चा करणार आहेत, असे शेलार सांगितले. राज्यासमोर गंभीर प्रश्न आ वाचून उभे आहेत, सामान्य जनता कोरोनानंतर पुन्हा एकदा त्यांचं सुरळीत आयुष्य सुरु करावं म्हणून कामाला लागली आहे. त्या वेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, युवक, महिला, बारा बलुतेदार या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभारावे ही प्राथमिकता आहे.मात्र सरकारची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना, असंही त्यांनी सांगितलं.

भ्रष्टाचार, गुन्हेगारीवरच सरकारचा पूर्णवेळ खर्च

शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, आमच्या आदिवासी आश्रम शाळांना मदत कशी करता येईल, शाळांचा विकास कसा करता येईल, बारा बलुतेदारांना रोजगार कसा देता येईल, करोनामध्ये दुर्देवाने जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराने मदतीसाठी अर्ज केले त्यांना मदत कशी मिळेल, या सगळ्या प्रश्नांवर कानाडोळा करण्याचे काम ठाकरे सरकार करते आहे. केवळ एकाच गोष्टीवर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार काम करते ते म्हणजे, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, आतंकवाद याच्या समर्थनार्थ पूर्णवेळ खर्च केला जातो आहे. भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरूपाचे वर्णन करावे लागेल इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ना खाऊंगा, ना खाने दुंगा

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2014 पासून आम्ही जनतेला वचन दिले आहे की, ना खाऊंगा ना खाने दुंगा. त्यामुळे 2014 पासून टप्प्याटप्प्याने कायद्याचे बदल, काळा पैशावर मात करण्याच्या योजना, या सगळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पळवाटा बंद करणाऱ्या कायद्यात सुधारणा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आता प्रत्यक्षात कारवाई, असा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्यामुळे या कारवाईमुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे, असंही ते म्हणाले.

भ्रष्ट तंत्र का किला ध्वस्त हो

एका वाक्यात सांगायचं झालं तर आज देश आणि महाराष्ट्र अशा वळणावर उभा आहे जिथे “लोकशाही विरुद्ध घराणेशाही” या संघर्षाला सुरुवात झाली आहे. हा संघर्ष टोकदार होत जातो आहे. जनतेला भ्रष्ट व्यवस्था नको आहे, त्यामुळे ही लढाई जनतेची आहे, असे सांगत एका गीताचे बोल त्यांनी ऐकवले.

भ्रष्ट तंत्र का किला ध्वस्त हो नैतिकता का पथ प्रशस्त हो दुर्जन को शासन का भय हो सज्जन का जीवन निर्भय हो व्यक्ति व्यक्ति यहां कहे गर्व से मुझ में मेरा धर्म बचा है!

हा नारा भाजपाचा आहे. या लढाईमध्ये जनता यशस्वी होईल. गरीब माणूस यशस्वी होईल. भ्रष्ट व्यवस्था पराजित होईल, आतंकवाद पराभूत होईल, ही जनतेला अपेक्षित असलेल्या रामराज्याची सुरुवात आहे, असंही ते म्हणाले.

यंत्रणा निष्पक्ष, सत्यसमोर आणतीलच

यंत्रणा आपलं काम करत आहेत. यंत्रणा निष्पक्ष आहेत. या यंत्रणांच्या चौकशीमध्ये काय येईल ते सत्य समोर आणतीलच. त्यामुळे त्यानंतर भाष्य करणे योग्य ठरेल. कोणत्याही पदावर बसलेल्या लोकांनी कायदेकानून, प्रथा परंपरा, यंत्रणांची नियम आणि नियमावली न पाळला वागू नये. त्याने राज्यामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठीच हा त्यांचा तो प्रयत्न आहे असाच समज होईल, अशा गोष्टींपासून पदावर बसलेल्या व्यक्तीने स्वतःला वाचवले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं.

भुजबळांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा

भुजबळ साहेब हे न्यायाधीशाच्या भूमिकेत नाहीत. त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अभ्यास करायला हरकत नाही. किंबहुना भाजप त्यांना स्कॉलरशिप देईल. कायदा सुस्पष्ट आहे, असा टोला पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा मोदींना देशातील निवडणूका महत्त्वाच्या, जयंत पाटलांनी करून दिली त्या ट्विटची आठवण

Maharashtra Police : हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! शासन निर्णय जारी

Russia Ukraine War : रशियाचा शरण येण्याचा इशारा, जीव गमावला पण 13 बॉर्डर गार्डसचं जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर; स्नेक बेटावर नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.