लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट नको, कोकणवासियांची बाप्पाशी भेट कशी होणार? : आशिष शेलार

"सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?" असे सवाल शेलार यांनी विचारले आहेत.

लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट नको, कोकणवासियांची बाप्पाशी भेट कशी होणार? : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 11:26 AM

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाला कात्री लावण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ मंडळानेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचे ठरवले असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र ‘लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका’ अशी मागणी केली आहे. (Ashish Shelar Demands again to allow Lalbaugcha Raja to celebrate Ganeshotsava)

“लालबागचा राजा आणि भक्तांची ताटातूट करु नका. कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती.” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. “सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य आहे का?” असे सवाल शेलार यांनी विचारले आहेत.

हेही वाचा : सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी

“सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आला आहे, पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी मूर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार आहेत, त्यांचे कौतुकच” असे ट्वीट आशिष शेलार यांनी आठ दिवसांपूर्वी केले होते.

“लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”..पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाएकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ” अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“संकट मोठे आहे, अशा वेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रद्धेला मोल नाही. श्रद्धा तोलूनही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?” असा सवाल आशिष शेलार यांनी तेव्हा विचारला होता.

काय आहे ‘लालबागचा राजा’चा निर्णय?

मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे.

कोरोना लढ्यात जे पोलीस जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली.

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

“लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Ashish Shelar Demands again to allow Lalbaugcha Raja to celebrate Ganeshotsava)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.