दिवाळीनिमित्त भेटीगाठी, आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शेलार म्हणाले…

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. (Ashish Shelar meets Raj Thackeray on occasion of diwali)

दिवाळीनिमित्त भेटीगाठी, आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; शेलार म्हणाले...
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 1:33 PM

मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रृत आहे. आशिष शेलार हे दर दिवाळीला राज ठाकरेंना भेटायला कृष्णकुंजवर येत असतात. आजही त्यांनी सकाळीच कृष्णकुंज गाठलं. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दिवाळी फराळ घेत घेत या दोघांनीही गप्पा मारल्या. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना यावेळी सिनेमावरील एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकावरच दोघांची चर्चा रंगली, असं सूत्रांनी सांगितलं.

पुस्तक भेट आणि प्रकृतीची विचारपूस

या भेटीनंतर आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधत भेटीचं कारणही सांगितलं. राजकारणापेक्षाही दीपावलीमध्ये एकमेकांना भेटायचं असतं. दिवाळीनिमित्त आमची भेट ठरली होती. ‘द बूक ऑन मुव्ही’ हे जगभरातील 100 सर्वोत्कृष्ट सिनेमांवरील पुस्तक पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. हे पुस्तक मी पाहिलं होतं. मला आवडलं. त्यामुळे राज यांना मी हे पुस्तक भेट म्हणून दिलं. शिवाय त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, असं शेलार यांनी सांगितलं.

राज नव्या घरात

दरम्यान, राज ठाकरे हे लवकरच नव्या घरात राहायला जाणार आहेत. राज यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच आहे. ‘कृष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या निवासस्थानी राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह प्रवेश करणार आहेत. राज यांच्या या नव्या घराला अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे नव्या इमारतीला काय नाव देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त असून, राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह या इमारतीमध्ये राहाण्यासाठी जाणार आहेत.

नव्या घरात काय?

राज यांच्या या नव्या घरात ग्रंथालयापासून ते समिती कक्षापर्यंतच्या सर्व सुविधा असणार आहेत. पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. यापुढे राज ठाकरे याच ठिकाणी कार्यकर्ते आणि पत्रकारांना भेटणार आहेत. तसेच इतर नागरिकांना देखील याच कार्यालयात राज ठाकरे यांची भेट घेता येणार आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले असून, आता दिवळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि कुटुंबीय लवकरच या नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे माझ्या कानात ‘ते’ वाक्य बोलले आणि मी ठरवलं आता भांडाफोड करायचाच, राणेंचा गौप्यस्फोट

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार?, नारायण राणेंचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

(Ashish Shelar meets Raj Thackeray on occasion of diwali)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.