‘उद्धव ठाकरे यांनी माती खाल्ली, बोटचेपीची भूमिका घेतली’, आशिष शेलार यांचा खोचक टोला

"उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली", असा घणाघात आशिष शेलारांनी केला.

'उद्धव ठाकरे यांनी माती खाल्ली, बोटचेपीची भूमिका घेतली', आशिष शेलार यांचा खोचक टोला
आशिष शेलार, उद्धव ठाकरेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 4:56 PM

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावरुन देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सावरकरांना पाठवलेलं एक पत्र प्रसारमाध्यमांसमोर सादर केलंय. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील सडकून टीका केली.

“खरं म्हणजे हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी आशा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली”, असा घणाघात आशिष शेलारांनी केला.

“केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली? हा आमचा सवाल आहे”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

हे सुद्धा वाचा

आशिष शेलारांची राहुल गांधींवर टीका

“आशिष शेलार यांनी इंदिरा गांधींचं स्वातंत्र्यवीर सावकर यांना पाठवलेलं एक पत्र पत्रकार परिषदेत दाखवलं. “या पत्रात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर असा उल्लेख केलाय. राहुल गांधी वीर या शब्दावरुन आपल्या भाषणात ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आजीचं पत्रसुद्धा त्यांनी वाचलेलं नाही”, असं आशिष शेलार म्हणाले.

“इंदिरा गांधी या सावरकरांचं युद्ध हे अतिशय धाडसी होतं असं म्हणतात. ब्रिटश सरकारच्या विरोधातील त्यांच्या कामांची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय”, असं शेलारांनी सांगितलं.

“राहुल गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढ्यापुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान हे बेअक्कलपणाचं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो”, अशी टीका शेलारांनी केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.