AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांकडे अजून सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचं संख्याबळ पोहोचलेलंच नाही?

राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींनंतर विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली.

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांकडे अजून सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचं संख्याबळ पोहोचलेलंच नाही?
rahul narwekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 7:45 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा भूकंप घडला. विरोधी पक्षनेते अजित पवार हे थेट सत्तेत सामील झाले. त्यांच्यासह आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आपल्याकडे सर्वाधिक आमदार आणि खासदारांचं बहुमत आहे, असा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. पण या आमदारांची यादी आणि संख्या विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. राहुल नार्वेकर यांनी आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“विरोधी पक्षनेत्याचा नेमणूक करण्याचा अधिकार हा पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावत असताना विधानसभेचे या संदर्भात काही नियम आहेत. त्याचप्रमाणे संविधानातही या विषयी तरतुदी आहेत. या सगळ्यांचा विचार करुन, संख्याबळ बघून योग्य निर्णय घ्यावा लागेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलत असताना तो पक्ष सत्तारुढ पक्ष म्हणून काम करत आहे की विरोधी पक्षात काम करत आहे? याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

‘जयंत पाटील यांची अपात्रतेच्या याचिकेची एकच प्रत मिळाली’

“विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा या सगळ्या बाबींचा विचार करुन, कायदेशीर तरतुदींचा विचार करुन योग्यरित्या आणि योग्य वेळेला घेतला जाईल”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. “माझ्याकडे आतापर्यंत अनेक निवेदनं आली आहेत. त्यापैकी एक अपात्रतेची याचिका महाराष्ट्राचे विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी केली आहे, त्याची प्रत माझ्याकडे आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या निवासस्थानी ही प्रत दिलीय. ती मला प्राप्त झालेली नाही”, असंही नार्वेकरांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“विधानसभेच्या विधीमंडळ सचिवालयात प्रतोद नियुक्तीबाबतची प्रत देण्यात आलेली आहे. पण माझ्याकडे आतापर्यंत अशी कोणतीही प्रत देण्यात आलेली नाही. तशी कोणती प्रत दिली गेली असेल तर नियमानुसार कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या निवेदनावर काही निर्णय घेतलाय का? असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. डिपार्टमेंटल नोटींग होणार. कायदेशीर तरतुदींचा अभ्यास होणार. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच “पक्षाचं विभाजन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही”, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीच्या संख्याबळाची माहिती पोहोचली नाही?

यावेळी राहुल नार्वेकर यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सामील झालेल्या आमदारांच्या संख्याबळाची माहिती आपल्यापर्यंत आली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “माझ्याकडे आतापर्यंत जे आकडे आहेत ते पूर्वीचेच आकडे आहेत. पक्षनिहाय जे संख्याबळ होतं तेच माझ्याकडे आहे. माझ्याकडे अद्याप कोणत्याही प्रकारचं स्पिट संदर्भातील याचिका झालेली नाही”, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.