AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुखावर हल्ल्याचा मोठा प्रयत्न, आरोपी चेहऱ्याला कपडा बांधून आले आणि…

शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

BIG BREAKING | शिवसेना शिंदे गटाच्या अंधेरी विभाग प्रमुखावर हल्ल्याचा मोठा प्रयत्न, आरोपी चेहऱ्याला कपडा बांधून आले आणि...
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 12:12 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतून वर्सोवाच्या दिशेने घरी जाताना चेहऱ्याला कपडा बांधून आलेल्या काही अज्ञात इसमांनी बॅटने गाडीची काच फोडली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पेवेकर यांनी केलाय. संबंधित घटनेनंतर अल्ताफ पेवेकर यांनी पोलिसात धाव घेतली.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. मुंबईत सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना दोन पक्षात विभागली गेली आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. असं असताना आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अल्ताफ यांनी ठाकरे गटावर आरोप केलाय. त्यामुळे याप्रकरणी काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे पोलीस तपासात सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.

गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.