Video| धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न; महिलेचा गेला तोल, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
चालती लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात महिला तोल जाऊन पडल्याची घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे.
मुंबई – चालती लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात महिला तोल जाऊन पडल्याची घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. भायकळा स्टेशनवर उभी असलेली एक महिला धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तोल गेल्याने ती ट्रेनच्या दरवाजामधून खाली पडली. महिला तोल जाऊन पडल्याचे लक्षात येताच, तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचारी सपना गोलकर यांनी धावत जाऊन या महिलेला बाजून केले. सपना गोलकर यांच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत. रेल्वे विभागाच्या वतीने ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. सोबतच संबंधित घटनेचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.
दिनांक 21.11.2021 को भायखला रेलवे स्टेशन पर एक 40 वर्ष महिला चलती लोकल ट्रेन में चढने का प्रयास करते समय संतुलन बिगङने के कारण चलती लोकल से गिरते समय स्टेशन पर तैनात महिला आरक्षक सपना गोलकर ने महिला यात्री की जान बजाकर सराहनीय कार्य किया गया । @RailMinIndia pic.twitter.com/ozOpo2c8ZM
— GM Central Railway (@GM_CRly) November 22, 2021
गोलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
या व्हिडीओमध्ये महिला धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना तिचा तोला गेला आणि ती खाली पडली. दरम्यान महिला खाली पडल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचारी सपना गोलकर यांनी धाव घेत या महिलेला लोकलपासून दूर केले. गोलकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत. गोलकर यांचे सर्व स्थरातून अभिनंदरन करण्यात येत आहे.
प्रवाशांना काळजी घेण्याचे आवाहन
दरम्यान मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील रेल्वेस्थानकांवर यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्लॅटर्फामवरून रेल्वे रूळावर पडलेल्या मुलाचे प्राण वाचले होते. आज पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, धावती लोकल पकडू नये असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस, सोमय्यांचा दावा; अजित पवारांबद्दल मात्र यू टर्न