Atul Bhaltkarkar :अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळं हिदुत्वाच्या व्याखेत बसतं? मुख्यमंत्र्यांच्या सभेला भातखळकरांचा प्रश्नांचा पंच

शिवसेना ही जनाबसेना झाली आहे. अशी टीका वारंवर भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बीकेसीतल्या सभेतून उत्तर देणार आहेत. मात्र या सबेआधी राज्यातील भाजप नेत्यांनी या सभेवरून मुख्यमंत्री आणि शिवसेनाला काही खोचक सवाल विचारण्यास सुरूवात केली आहे.

Atul Bhaltkarkar :अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळं हिदुत्वाच्या व्याखेत बसतं? मुख्यमंत्र्यांच्या सभेला भातखळकरांचा प्रश्नांचा पंच
अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळं हिदुत्वाच्या व्याखेत बसतं? मुख्यमंत्र्यांच्या सभेला भातखळकरांचे प्रश्नांचा पंचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 5:36 PM

मुंबई : येत्या 14 मेला मुंबईतील बीकेसीतील मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) तोफ धडाडणार आहे. शिवसेना (Shivsena) बीकेसीतल्या हुंकार सभेपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरूवात करणार आहे. या सभेकडे अनेकांच्या नजारा लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू आहे. हिंदूत्व(Hindutva), हनुमान चालीसा, नवनीत राणा, रवी राणा, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अशा विविध मुद्द्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शिवसेने सत्तेसाठी हिंदूत्व सोडलं, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, शिवसेना ही जनाबसेना झाली आहे. अशी टीका वारंवर भाजपकडून होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बीकेसीतल्या सभेतून उत्तर देणार आहेत. मात्र या सबेआधी राज्यातील भाजप नेत्यांनी या सभेवरून मुख्यमंत्री आणि शिवसेनाला काही खोचक सवाल विचारण्यास सुरूवात केली आहे. आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याच सभेवरून मुख्यमंत्र्यांना पाच सवाल केले आहेत.

अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पाच सवाल

  1. ही फक्त भाजप द्वेषाची गरळ ओकणारी सभा की जनतेच्या प्रश्नांची उत्तर देणार ? असा पहिला सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
  2. उमर खालीद, शरगील उस्मानी आणि आता अकबरूद्दीन ओवैसी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात ? उमर खालीदची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली अकबरूद्दीन ओवैसीवर तात्काळ गुन्हा दाखल करणार का ? हा दुसरा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
  3. तर पक्षप्रमुख म्हणून बोलणार की मुख्यमंत्री म्हणून बोलणार ? आणि मुख्यमंत्री म्हणून बोलणार असाल तर मुंबई मेट्रोच काय झाल? हा तिसरा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
  4. अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळ हिदुत्वाच्या व्याख्येत बसत का ? हा चौथा सवाल भातखळकरांनी केला आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. तर गेल्या अडीच वर्षात सामान्य नागरिकांसाठी काय केल? हे ही सभेत सांगावं, उद्याच्या सभेनंतर तरी आठवड्यात चार वेळा मंत्रालयात मुख्यमंत्री जाणार का ? असा पाचवा सवाल भाजपकडून शिवसेनेला करण्यात आलाय.

मुख्यमंत्री मलिकांना पाठिशी घालतात

ही सभा होण्याआधीच शिवसेनेच्या हुंकार सभेला भाजपचे 5 खोचक प्रश्न आल्याने ही सभा वादळी होणार हे आधीपासूनच दिसून येत आहे. भाजपचं हिंदूत्व, मनसेचं हिंदूत्व यावर तुम्ही बोलू नका. हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच हिंदूत्व तरी तुम्ही बाळगा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री हे दाऊदच्या बाजूनच बोलणार. नवहिंदूत्ववादी उद्धव ठाकरे हे नवाब मलिकांचीच बाजू घेत आहेत. दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या मंत्र्यांना हे पाठीशी घालत आहेत, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....