माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, वीरमातेच्या हस्ते बच्चू कडूंच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन
वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन करण्यात आले (Bacchu Kadu Anuradha Gore)
मुंबई : वीरमाता अनुराधा गोरे (Anuradha Gore) यांच्या हस्ते शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या मंत्रालय दालनाचे उद्घाटन करण्यात आले. अनुराधा गोरे या 1995 मध्ये भारत पाक युद्धात शहीद झालेले जवान कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता आहेत. माझं कार्यालय सर्वांचं दुःख दूर करणार, अशा भावना यावेळी बच्चू कडूंनी व्यक्त केल्या. (Bacchu Kadu Mantralaya office inauguration by Anuradha Gore)
“माझे मंत्रालय सर्वांचे दुःख दूर करणार”
“माझे मंत्रालयातील कार्यालय हे अतिशय बोलकं, चालतं, दुःखहरण करणारं, प्रेरणा देणारं कार्यालय म्हणून निर्माण करण्याचे प्रयत्न आपण करुयात. तशा स्वरुपात कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी काम करतील” अशा भावना यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या.मंत्रालय दालनात शेतकरी, शोषित आणि शहिदांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे कपाट तयार करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी बच्चू कडू यांनी दिली.
1995 मध्ये भारत पाकिस्तान युध्दात कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांच्या हस्ते मंत्रालयात दालन क्र. २३१ दुसरा मजला येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रहारचे आ. राजकुमार पटेल उपस्थित होते. pic.twitter.com/SzcCHH9Ebj
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 3, 2021
अनुराधा गोरे कोण आहेत?
अनुराधा गोरे या मुंबईत पार्ले टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहे. त्यांचे सुपुत्र कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांना 26 सप्टेंबर 1995 रोजी वयाच्या 26 व्या वर्षी वीरमरण आले. भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात ते शहीद झाले.
मुलाच्या निधनानंतर अनुराधा गोरे यांनी अनेक शाळांतून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारी व्याख्याने देण्यास आणि वर्तमानपत्रांत लेख लिहिण्यास सुरुवाती केली. गोरे यांची बहुतेक पुस्तके सैन्य आणि सैनिक या विषयांशी संबंधित आहेत. अनुराधा गोरे जानेवारी 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या. त्या मूळच्या सातार्याच्या आहेत.
संबंधित बातम्या :
मंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या, आता बच्चू कडू म्हणतात, मंत्रिपद पणाला लावणार
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण देत दिवाळी केली खास!
(Bacchu Kadu Mantralaya office inauguration by Anuradha Gore)