अमिताभ ते संजय दत्त, बाळासाहेबांच्या मित्र यादीत कोण-कोण?

मुंबई: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं. बाळासाहेब […]

अमिताभ ते संजय दत्त, बाळासाहेबांच्या मित्र यादीत कोण-कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मारकाला वंदन करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक शिवतीर्थावर येत असतात. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट ठाकरे सिनेमाच्या निमित्ताने 25 जानेवारीला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांची सर्वक्षेत्रातील दिग्गजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात कट्टर विरोधकांचीही राजकारणापलिकडची मैत्री त्यांनी जपली होती. साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात बाळासाहेबांचा वावर होता. बॉलिवूडशी तर बाळासाहेबांचं वेगळं नातं होतं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं ‘मातोश्री’वर येणंजाणं होतं.

1) दिलीप कुमार आणि बाळासाहेबांची मैत्री

अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती. दोघेही अनेकवेळा गप्पांच्या निमित्ताने मातोश्रीवर भेटत. दिलीप कुमार, सुनील दत्त आणि जितेंद्र यांच्यासोबत बाळासाहेब तासनतास गप्पा मारत. दिलीप कुमार हे बाळासाहेबांचे आवडते अभिनेते होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर दिलीप कुमार खूपच अस्वस्थ होते. या दोघांची मैत्री जरी असली तरी त्यांच्यात खडाखडीही होत असे. दिलीप कुमार यांना पाकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज पुरस्कार दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी तो परत करण्यास बजावलं होतं.

2) अमिताभ बच्चन

बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं. 1983 मध्ये जेव्हा कुली सिनेमाच्या सेटवर बिग बी जखमी झाले होते, तेव्हा बाळासाहेब स्वत: त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

3) बाळासाहेबांनी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता संजय दत्त, सलमान खान, रीना रॉय यांना हवी ती मदत केली. संजय दत्तवर टाडा अंतर्गत आरोप झाले, त्यावेळी बाळासाहेबांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला.

4) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठीही बाळासाहेब ठाकरे हे वडिलांसमान होते.

5) किंग खान शाहरुखचेही बाळासाहेबांशी चांगले संबंध होते. मात्र राजकीय मंचावरुन बाळासाहेबांनी शाहरुख खानवर नेहमीच टीका केली. शाहरुखने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतल्यामुळे बाळासाहेब भडकले होते.

6) दिग्दर्शक राम गोपाल वर्माचेही बाळासाहेब ठाकरेंसोबत चांगले संबंध होते. राम गोपाल वर्मा बाळासाहेबांना रियल सरकार संबोधत होते

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.