Eknath Shinde : संजय राऊतांना काय म्हणायचंय ते त्यांनाच विचारा, बाळासाहेब थोरातांनी टोलवला विधानसभा बरखास्तीचा विषय

मंत्रिमंडळ बैठक चांगली होईल, आम्ही चांगले निर्णय घेऊ. आमच्याकडे असलेल्या विषयांवर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता जाणार, अशा चर्चा होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Eknath Shinde : संजय राऊतांना काय म्हणायचंय ते त्यांनाच विचारा, बाळासाहेब थोरातांनी टोलवला विधानसभा बरखास्तीचा विषय
बाळासाहेब थोरात (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:27 PM

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे ठाम वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे. कॅबिटेनच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) म्हणाले. मात्र नंतर काँग्रेसमधून असे समोर आले, की पटोलेंना राज्यपाल असे म्हणायचे होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठकीला येणार का, असा सवाल बाळासाहेब थोरात यांना विचारला असता, याविषयी काहीही माहिती नाही, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी उलथून टाकणारी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे 46 आमदार असल्याचे बोलले जात आहे.

‘राऊतांना काय म्हणायचे, ते त्यांना विचारा’

विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे संकेत संजय राऊत यांनी दिले. त्यावर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय, हे त्यांनाच विचारले पाहिजे. विधानसभा बरखास्तीचा विषयच आमच्यासमोर आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार कशी, असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर त्यांनाच विचारायला हवे. उलटसुलट चर्चा होत आहेत. मात्र या केवळ चर्चा आहेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने.. अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘संख्याबळ आमच्याकडेच’

एकनाथ शिंदे यांनी पन्नासच्या वर आमदार पाठीशी असल्याचा दाव केला आहे. यावर विचारले असता, कोण काय दावा करते याला महत्त्व नाही. संख्याबळ आमच्याकडेच आहे. आम्हाला कोणताही धोका नाही. ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. मंत्रिमंडळ बैठक चांगली होईल, आम्ही चांगले निर्णय घेऊ. आमच्याकडे असलेल्या विषयांवर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता जाणार, अशा चर्चा होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे थोरात म्हणाले आहेत.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.