Barge P305 : ONGC कडून मृत्युमुखी आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्यासह बचावलेल्यांनाही आर्थिक मदत

ONGC कडून चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या, बेपत्ता असलेल्या आणि वाचलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलीय.

Barge P305 : ONGC कडून मृत्युमुखी आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्यासह बचावलेल्यांनाही आर्थिक मदत
Barge P305
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 9:35 PM

मुंबई : तौत्केच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज ‘पी-305’ वरुन आतापर्यंत 186 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर 51 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. अजून 27 कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. या दुर्घटनेनंतर बार्जच्या चीफ इंजीनिअरने दिलेल्या तक्रारीनंतर कॅप्टन आणि अन्य लोकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार चीफ इंजीनिअर रहमान हुसेन यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार कॅप्टन राकेश बल्लव आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ONGC (Oil and Natural Gas Corporation) कडून चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्या, बेपत्ता असलेल्या आणि वाचलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलीय. ( ONGC announce financial assistance to the employees and families affected by cyclone)

अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात ONGCच्या प्रकल्पावर काम करणार्‍या मेसर्स अफकॉन्सच्या तीन बांधकाम बार्जेस आणि ONGCच्या एका फ्लोटर ड्रिलिंग रिगला चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. बार्ज पी-305 गटांगळ्या खाऊ लागले आणि ते ओएनजीसीच्या मानवरहित प्लॅटफॉर्मवर आदळले. बार्ज आदळल्यानंतर त्यात पाणी शिरले आणि अखेर 17 मे, 2021 रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास ते उलटले. INS कोची आणि INS कोलकाता यांच्यासह भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांसह ओएनजीसीच्या किनाऱ्यावरील मदत नौका बचाव कार्यासाठी ताबडतोब सेवेत तैनात करण्यात आल्या. तटरक्षक दल आणि ONGCसह भारतीय नौदलाचे व्यापक शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

ONGC कडून किती मदत?

मेसर्स अफकॉन्स बाधित कर्मचाऱ्यांना भरपाई देण्याबाबत काम करत आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ONGC व्यवस्थापनाने बचावलेल्याना 1 लाख रुपयांची आणि मृत्युमुखी पडलेल्या आणि बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 2 लाख रुपयांची त्वरित मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

निसर्गाच्या आक्राळ रुपाविरुद्धच्या या लढ्यादरम्यान, ONGCच्या कर्मचार्‍यांनी अनुकरणीय धैर्य दाखवून बार्जेस चालवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीचे हे महारत्न पीएसयू बचाव आणि पुनर्वसन काम पाहत आहे. त्यांचा व्यवसाय भागीदार मे. अफकॉन्स जे प्रभावित बार्जेसचे परिचालन पाहत होते , ते या कामात ONGC बरोबर आहेत. यामुळे अधिक जीव वाचतील या आशेने बचाव आणि शोध घेण्याचे संयुक्त प्रयत्न आणखी काही दिवस सुरू ठेवले जातील.

मदतकक्षाची स्थापना

ONGC ने मदत पुरवण्यासाठी एक मदतकक्ष देखील स्थापन केला आहे. ONGC बचाव कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना रसद आणि खर्च पुरवेल. हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणेः 022-26274419, 022-26274420 आणि 022-26274421. तसंच संकेतस्थळ www.ongcindia.com वर प्रभावित कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Barge P305 | मी जहाजावरुन परत आलो की बोलू, पण…, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा हंबरडा

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

ONGC announce financial assistance to the employees and families affected by cyclone

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.