रुग्ण सेवेसाठी’ बेस्ट’ धावणार, मिनी एसी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत
मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी बेस्ट बस कोरोना विरोधातील लढ्यात आधीच उतरली (Mini best bus convert to ambulance) आहे.
मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी बेस्ट बस कोरोना विरोधातील लढ्यात आधीच उतरली (Mini best bus convert to ambulance) आहे. त्यात आता बेस्ट उपक्रमाकडून रुग्ण सेवा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची लाईफ लाईन बेस्ट बस (Mini best bus convert to ambulance) आता रुग्ण सेवेसाठीही धावणार आहे.
मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिकेच्या रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आणि कोरोना संशयीत रुग्णांना वेळीच रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. परंतु कोरोना रुग्ण वाढत असून रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रमाकडून सध्या 7 मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले आह. बेस्ट एकूण 20 मिनि वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करणार आहे, असं बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.
दिवसेंदिवस राज्यासह मुंबई शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या विषाणूवर रोख मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत राज्यात 7 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात 19 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा विळखा वाढला, मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
परराज्यातील मजुरांना नक्की घरी पाठवू, पण ट्रेन सुरु करणार नाही : मुख्यमंत्री