BEST | खासगीकरणाला विरोध करणारी मुंबईकरांची ‘बेस्ट’ भाडेतत्वावर बसेस घेणार
बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कंत्राटदारांकडून खासगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. BEST Buses
मुंबई: राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईला वीज आणि बससेवा पुरवणारा बेस्ट उपक्रम सध्या तोट्यात आहे. बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कंत्राटदारांकडून खासगी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेस्टने 400 बसेस कंत्राटदारकडून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आहे. कंत्राटदारांकडून घेतलेल्या बसेसवर ड्रायव्हर आणि कंडक्टरही कंत्राटी असणार आहेत. खासगीकरणाला विरोधाची भूमिका असताना या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे. (BEST take decision of hire four hundred buses and conductors on contract)
400 बसेस 10 वर्षांचा करार
बेस्ट उपक्रमाने सीएनजीवर चालणाऱ्या 400 बस 10 वर्षांच्या कराराने घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1,942 कोटी रुपये खर्चून या बस सेवेत उपक्रमात आणण्याचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीत मंजूर झाला. परंतु आतापर्यंत भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससेवेसाठी चालक कंत्राटी पद्धतीने घेतले जात आहेत. मात्र, नवीन प्रस्तावात बस, चालकांपाठोपाठ कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने येणार आहेत.
भाजपचा विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर
बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपने त्या प्रस्तावास विरोध दर्शविला केला. कंत्राटीकरण होत चालल्याने बेस्टचे अधिकार कायम राहणार नाहीत, असा आक्षेप भाजपने घेतला. बेस्टमध्ये भाड्याने बस घेतानाच चालकापाठोपाठ कंडक्टरही खासगी स्तरावर राहिल्यास बेस्टचे काय होणार असा सवाल बेस्ट समितीतील भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्ष काँग्रेसची भूमिका
बेस्टच्या ताफ्यात लवकर बस याव्या आणि प्रवाशांना सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही हा प्रस्ताव मंजूर करायला सत्ताधारी पक्षाला मदत केली. आमचा खासगीकरणाला विरोध आहे, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.
दरम्यान, बेस्टच्या ताफ्यात पुढील काळात 4 हजार बसेस कंत्राटदारांकडून घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, आता ‘बेस्ट’चे कर्मचारी आक्रमक!
श्वास घेण्यास त्रास झाल्याने कँटिनमध्येच कंडक्टरचा मृत्यू; मुंबईतल्या बेस्टच्या मरोळ आगारातील घटना
(BEST take decision of hire four hundred buses and conductors on contract)