Video : …आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांमधील डॉक्टर जागा झाला! दिल्लीत बेशुद्ध झालेल्या टीव्हीच्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार

दिल्लीत एका टीव्ही कार्यक्रमात भागवत कराड सहभागी झाले होते. त्यावेळी एका कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चालू कार्यक्रमातच बेशुद्ध होऊन कोसळला. त्यावेळी भागवत कराड यांनी पुढे होऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

Video : ...आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांमधील डॉक्टर जागा झाला! दिल्लीत बेशुद्ध झालेल्या टीव्हीच्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 7:06 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हे पेशानं डॉक्टर आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेतून ते राजकारणात आले. महापौर ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री (Union State Minister of Fianance) पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून संपूर्ण देशात आपला ठसा उमटवत असतानाच त्यांच्यातील डॉक्टर त्यांनी कधीही बाजूला केला नाही. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. दिल्लीत एका टीव्ही कार्यक्रमात भागवत कराड सहभागी झाले होते. त्यावेळी एका कॅमेरामनला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चालू कार्यक्रमातच बेशुद्ध होऊन कोसळला. त्यावेळी भागवत कराड यांनी पुढे होऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार (First Aid) केले. कराड यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भागवत कराड कोण आहेत?

  • 1995 ते 2009 या कालावधीत औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा नगरसेवक
  • 1997 ते 1998 औरंगाबादचे उपमहापौर
  • 2000 ते 2001 आणि 2006 ते 2007 औरंगाबादचे महापौर
  • 2009 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी
  • 2021 मध्ये भाजपकडून राज्यसभेवर

डॉ. भागवत कराड यांची ओळख

डॉ. भागवत किशनराव कराड यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील चिखली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कराड यांचे दहावीपर्यंतचे जिल्हा परिषद शाळेत झाले. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून त्यांनी प्री-मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी संपादन केली. एमएस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील वैद्यकीय क्षेत्रातील अती उच्च एम.सीएच (पेडियाट्रीक) ही मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर असल्याचा भागवत कराड यांचा दावा आहे.

अपक्ष नगरसेवक म्हणून विजयी

डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.