Bhandup Fire: ड्रीम्स मॉलच्या रुग्णालयाला OC आणि अग्निशामन यंत्रणा नव्हती, मृतांचा आकडा वाढला

हा मॉल HDIL कंपनीने बांधला आहे. या मॉलमध्ये 1056 दुकाने आहेत, त्यापैकी 500 ते 600 दुकाने अजूनही सुरु आहेत. | Bhandup Fire

Bhandup Fire: ड्रीम्स मॉलच्या रुग्णालयाला OC आणि अग्निशामन यंत्रणा नव्हती, मृतांचा आकडा वाढला
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 11:33 AM

मुंबई: भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. ड्रीम्स मॉल म्हणजे घोटाळ्यांचा महाल आहे. आग लागलेल्या सनराईझ रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाले नव्हते. तसेच रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya on Bhandup Dreams mall fire)

ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग पसरत जाऊन तिने भीषण स्वरुप धारण केले होते. यामध्ये आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील 70हून अधिक लोकांना अग्निशमन दलाने शिडीच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढले.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ड्रीम्स मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. हा मॉल HDIL कंपनीने बांधला आहे. या मॉलमध्ये 1056 दुकाने आहेत, त्यापैकी 500 ते 600 दुकाने अजूनही सुरु असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

‘त्या’ दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

सनराईझ रुग्णालयाला आग लागल्यानंतर सुरुवातीला दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर कोरोनामुळे झाला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावरुन किरीट सोमय्या चांगलेच संतापले. रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असा दावा करणाऱ्यांना आधी तुरुंगात टाका. रुग्णांच्या मृत्यूसाठी मॉलच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली.

पालिकेचे अधिकारी झोपले होते का, त्यांना निलंबित करा: मनसे

या घटनेनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल त्यांनी विचारला. स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच येत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग

भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

संबंधित बातम्या:

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 9 जणांचा होरपळून मृत्यू

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील आगीचे रौद्ररुप, पाहा फोटो

(Kirit Somaiya on Bhandup Dreams mall fire)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.