“त्यांनी आता खाली बघून चालावं”; शिवसेनेच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या आमदारांना तंबीच दिली

आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे.

त्यांनी आता खाली बघून चालावं; शिवसेनेच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या आमदारांना तंबीच दिली
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:41 PM

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दोन आठवड्यापर्यंत असल्यामुळे आम्ही काही ठाकरे गटाच्या आमदारांना कारवाईचा व्हीप बजावणार नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर राहण्याचा व्हीप आम्ही त्यांना बजावणार असल्याचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. हा व्हीप कारवाईचा नाही तर नियमाप्रमाणे असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर ऐकले नाही तर ठाकरे गटाच्या आमदारांवर रितसर कारवाई करणार असल्याचा इशारा भरत गोगावले यांनी लगावला आहे.

आमच्यावर गद्दारीचा जरी ठपका ठेवला गेला असला तरी आम्ही गद्दार नाही. आणि आम्ही गद्दार असतो तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले नसते असा टोला भरत गोगावले यानी ठाकरे गटाला लगावला आहे. आम्ही पक्ष सोडलाच नाही, त्यामुळे आता ठाकरे गटाने ठरवावे.

त्यांच्यावर कारवाई होणार ही शंभर टक्के होणार, त्यांनी आता खाली बघून चालावं नाही तर ठेच लागते असा इशाार भरत गोगावले यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.

आज आदित्य ठाकरे यांनी 32 वर्षाच्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना घाम फोडला असं बोललं जात असले तरी अजून पर्यंत एकनाथ शिंदे यांना ठक्कर देणारा अजून कोणी आला नाही असंही भरत गोगावले यानी सांगितले आहे.

भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आता काँग्रेसच्या सोनिया गांधी आता राजकारणापासून संन्यास घेणार आहेत,

त्यामुळे संजय राऊत यांनीही ठाकरे गटापासून संन्यास घेतला गेला तर बरं होईल कारण त्यांच्यामुळे ठाकरे गटाला थोडी स्थिरता मिळेल असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.