युक्रेनमध्ये 4 मंत्री पाठवून इव्हेंट, यापूर्वीच सर्व मुलांना वाचवायला हवे होते; भुजबळांकडून मोदींना आहेर!

छगन भुजबळांनी यावेळी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिकांचे समर्थन केले. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे, हे आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. भाजप नेत्यांनी त्याचे राजकारण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला. महाविकास आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीला काहीही होणार नाही.

युक्रेनमध्ये 4 मंत्री पाठवून इव्हेंट, यापूर्वीच सर्व मुलांना वाचवायला हवे होते; भुजबळांकडून मोदींना आहेर!
छगन भुजबळ आणि नरेंद्र मोदी.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:55 PM

मुंबईः रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतर आता युक्रेनमध्ये चार मंत्री पाठवून मोदी सरकार इव्हेंट करत आहे. खरे तर सर्व भारतीय मुलांना पूर्वीच वाचवायला हवे होते, अशी जोरदार टीका मंगळवारी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकावर केली. भुजबळ म्हणाले की, रशिया-युक्रेनची लढाई (Russia-Ukraine war) सुरू झाली आहे आणि आता मोदी (Modi) सरकार बैठका घेत आहेत. यापूर्वीच खरे तर या सर्व मुलांना वाचवणे गरजेचे होते. अमेरिकेने ज्या पद्धतीने आधीच सर्व नागरिकांना बोलावून घेतले तसेच आपल्या देशानेही करायला हरकत नव्हती. आता चार मंत्री पाठवून इव्हेंट केला जातोय. याला काही अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची अशा पद्धतीचे भाजपचं राजकारण आहे.

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आम्हीही ओबीसी आरक्षणाच्या निकालाची वाट बघत होतो. आम्हाला कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल अपेक्षा होती. कारण आम्ही तिन्ही टेस्ट पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा निकाल बुधवारी येणार आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल अशा आम्हाला अपेक्षा आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच

भुजबळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या संदर्भातला नियम विधिमंडळाने केलेला आहे आणि त्यात काही चुकीचे आहे असे म्हणण्याचे कारण नाही. हात वर करून मतदान करा, अशा पद्धतीचा कोर्टाने निकाल दिला होता. राज्यपालांनीही अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, असे सांगितले होते. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे वाटते आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मलिकांचा राजीनामा नाहीच

भुजबळांनी यावेळी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिकांचे समर्थन केले. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे, हे आम्हाला वाटते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही. भाजप नेत्यांनी त्याचे राजकारण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला. महाविकास आघाडी अभेद्य आहे. महाविकास आघाडीला काहीही होणार नाही. विरोधक म्हणून भाजपने ज्या गोष्टी करायच्या असतात त्या कराव्यात, पण महाविकास आघाडी ला कुठलीही अडचण येणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्याः

रशियाच्या राजनैतिक मिशनच्या 12 सदस्यांची हकालपट्टी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे मोठे पाऊल

tv9 Explainer: रशिया यूक्रेनमध्ये घुसला खरा पण गेल्या 5 दिवसात त्याला त्यात किती यश आलंय? समजून घेऊया 10 मुद्यांच्या माध्यमातून

Russia Ukrane War: तब्बल 64 KM चा रशियन ताफा, कीवला घेरण्यासाठी रशिया सज्ज

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.