नवी मुंबईत तब्बल 1 हजार कोटीचं ड्रग जप्त, आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली अफगाणिस्तानमार्गे तस्करी

अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या हेरॉईन ड्रग्सची नवी मुंबईत मोठी खेप पकडली गेली आहे (Big action against heroin drugs)

नवी मुंबईत तब्बल 1 हजार कोटीचं ड्रग जप्त, आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली अफगाणिस्तानमार्गे तस्करी
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 1:55 PM

नवी मुंबई : थेट अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या हेरॉईन ड्रग्सची नवी मुंबईत मोठी खेप पकडली गेली आहे (Big action against heroin drugs). या कारवाईत जवळपास 191 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या 191 किलो हेरॉईनची किंमत 1,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

अधिकाऱ्यांनी सांगितले की नवी मुंबईतील न्हावा सेवा बंदरावर पकडलेल्या या हेरॉईनची तस्करी समुद्रमार्गे अफगाणिस्तानातून होत आहे. संचालनालय महसूल बुद्धिमत्ता (डीआरआय) आणि सीमाशुल्क विभागाने संयुक्त कारवाईत या वस्तू हस्तगत केल्या. या संदर्भात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आयुर्वेदिक औषध असल्याची बतावणी

ड्रग्स तस्करांनी हे ड्रग्स आयुर्वेदिक औषधं म्हणून प्लास्टिकच्या पाईपमध्ये लपवून ठेवली. हे पाईप बांबूचे तुकडे दिसतील अशाप्रकारे पॅकिंग करण्यात आली. तस्करांनी याला आयुर्वेदिक औषधं असल्याची बतावणी केली. या प्रकरणात, ड्रग्सच्या आयातीसाठी कागदपत्रे तयार करणार्‍या 2 कस्टमच्या एजंटला अटक केली आहे.

या व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केल्याची चर्चा आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्लीच्या एका फायनान्सरलाही अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबईत आणण्यासाठी तयारी सुरु आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 जणांना मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. हे सर्व अमली पदार्थ एका कंटेनरमध्ये लपवण्यात आले होते. त्यामुळे आता कंटेनरच्या मालकाचीही चौकशी केली जात आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या औषधांच्या नावाखाली तस्करी

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण मुळेठी, लवंग, काळीमिरी या मसाला पदार्थांचा वापर करतो. परंतु, याच आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली आता अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. जेएनपीटी बंदरातून अवैधरित्या आलेले 1 हजार कोटी किमतीचे अमली पदार्थ सीमाशुल्क विभागाने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

नावाशेवा येथील कस्टम स्पेशल इंटेलिजेन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी JNPT पोर्टमध्ये अफगाणिस्तान, इराणहून आलेल्या कंटेनरमधील 191 किलो हिरोईन जप्त केले. याची सध्या बाजारात किंमत अंदाजे 1 हजार कोटी रुपये आहे. हे सर्व अमली पदार्थ प्रीती लॉजिस्टिकमध्ये कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात आले होते. माल आयात करणाऱ्या कंपनीने कागदावर आयुर्वेदिक औषधे असल्याची माहिती दाखवली होती. पण कंटेनरमध्ये मसाल्याच्या नावाखाली 191 किलो हेरॉईन लोखंडी पाईपमध्ये ठेवण्यात आलं होतं.

सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत 191 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत जणांचा तपास चालू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. दरम्यान, DRI ने याबाबत इतके अमली पदार्थ मागवणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्याची कसून चौकशी सुरु केली आहे. यामागे कोणाचा हात आहे याचा तपास करण्यासाठी दिल्ली, मुंबईमध्येही पथकं रवाना केली आहेत.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

UGC | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा, सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…

Big action against heroin drugs

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.