Rakesh Jhunjhunwala : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईत निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

काही सर्वात यशस्वी भारतीय गुंतवणूकदारांमध्ये (Ace investor) गणले जाणारे झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हणून संबोधले जात असे. झुनझुनवाला, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, हंगामा मीडिया, अॅपटेकचे अध्यक्ष होते. इतर अनेक भारतीय कंपन्यांमध्ये त्यांनी बोर्ड पदे भूषवली होती.

Rakesh Jhunjhunwala : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईत निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
राकेश झुनझुनवालाImage Credit source: fortuneindia
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:29 AM

मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे मुंबईत निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. सकाळी 6.45 वाजता त्यांना कँडी ब्रीच रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याच्या अनोख्या गुंतवणूक शैलीमुळे त्यांना ‘बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट’ (Big Bull of Dalal Street) म्हणूनही ओळखण्यात येत होते. काही सर्वात यशस्वी भारतीय गुंतवणूकदारांमध्ये (Ace investor) गणले जाणारे झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हणून संबोधले जात असे. झुनझुनवाला, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, हंगामा मीडिया, अॅपटेकचे अध्यक्ष होते. इतर अनेक भारतीय कंपन्यांमध्ये त्यांनी बोर्ड पदे भूषवली होती. ते व्हाइसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोव्होग इंडिया आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संचालक मंडळात होते. विविध आजारांनी ते ग्रस्त असल्याची माहिती होती.

अब्जाधीशांच्या यादीत…

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, झुनझुनवाला हे पहिल्या 500 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांची एकूण संपत्ती जुलै 2022पर्यंत $5.5 अब्ज आहे. आयकर आयुक्त वडिलांच्या पोटी जन्मलेल्या झुनझुनवाला यांनी कॉलेजमध्ये असतानाच स्टॉक ट्रेडिंग सुरू केली. 1985मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक अवघ्या 150वर असताना बिग बुलचा गुंतवणुकीचा प्रवास केवळ $100 पासून सुरू झाला. वडिलांनी आपल्या मित्रांशी चर्चा केल्यावर त्यांना शेअर बाजाराची आवड निर्माण झाली. झुनझुनवालाची सर्वात फायदेशीर गुंतवणूक टायटन, टाटा स्टेबलमधील ज्वेलरी प्ले होती.

खासगी मालकीची ट्रेडिंग कंपनी

झुनझुनवाला RARE एंटरप्रायझेस नावाची खासगी मालकीची ट्रेडिंग कंपनी चालवत होते. या कंपनीचे नाव त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावावरून पडले. झुनझुनवाला टायटन, क्रिसिल, अरबिंदो फार्मा, प्राज इंडस्ट्रीज, एनसीसी, अॅपटेक लिमिटेड, आयन एक्सचेंज, एमसीएक्स, फोर्टिस हेल्थकेअर, लुपिन, व्हीआयपी इंडस्ट्रीज, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, रॅलिस इंडिया आणि जुबिलंट लाइफ सायन्सेस आदी कंपन्यांशी संबंधित आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतच झाले लहानाचे मोठे

झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. ते मुंबईत लहानाचे मोठे झाले. तिथे त्यांचे वडील आयकर अधिकारी म्हणून तैनात होते. झुनझुनवाला यांनी 1985मध्ये सिडनहॅम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेत दाखल झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.