Ajit Pawar | शिखर बँक घोटाळ्याप्रकरणात मोठी अपडेट! प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा न्यायालयात

Ajit Pawar | शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी विशेष न्यायालयात अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पोलिसांनी प्रकरणात 'सी' समरी रिपोर्ट दाखल केला आहे.

Ajit Pawar | शिखर बँक घोटाळ्याप्रकरणात मोठी अपडेट! प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा न्यायालयात
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 11:25 AM

मुंबई | 2 March 2024 : तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (शिखर बँक) कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट आली. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता धार चढणार आहे. या मुद्यावर आता राज्यात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या कथित घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा अर्ज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांनी प्रकरणात ‘सी’ समरी पण सादर केली आहे. न्यायालयात याप्रकरणी आता 15 मार्च रोजी सुनावणी होईल.

पोलिसांचे म्हणणे काय

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार यंच्याविरोधात कही ठोस सापडले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. EOW ने तपासबंद अहवाल (Closer Report) न्यायालयात सादर केला आहे. सुनावणीच्या दिवशी तो न्यायालयासमोर येईल. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने जर हा अहवाल स्वीकारला तर अजित पवार या घोटाळ्यातून सहिसलामत बाहेर पडतील.

हे सुद्धा वाचा

कुठंय चक्की पिसिंग

याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. या घोटाळ्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यायला हवा. भ्रष्टाचार सहन करणार नाही असे ते म्हणाले होते. भ्रष्टाचार संपविण्याची मोदी गॅरंटी होती. देवेंद्र फडणवीस हेच अजित पवार यांना चक्की पिसिंग, चक्की पिसिंग करायला लावणार होते, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

सी समरी म्हणजे काय

चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येतो. गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो. तेव्हा पोलीस सी समरी अहवाल न्यायालयात दाखल करतात. नव्याने तपास करुन सुद्धा काही हाती लागले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान 2022 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने नव्याने तपास करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. तर जुलै 2023 मध्ये अजित पवार ृ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

आव्हान देणार

विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे ‘सी’ समरी अहवाल सादर केला आहे. न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे यप्रकरणात सुनावणी होईल. 15 मार्च रोजी ही सुनावणी होईल. दरम्यान आमच्या याचिका प्रलंबित असताना तपास यंत्रणेने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे, त्याला आव्हान देणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वकील सतीश तळेकर यांनी सांगितले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.