Bird Flu | पोल्ट्री फार्म मालक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालं!

चिकन आणि अंडी खाल्ल्यानं बर्ड फ्लू होतो, अशी अफवा पसरल्यानं मुंबईच्या चिकन उद्योगाला फटका बसलाय.

Bird Flu | पोल्ट्री फार्म मालक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालं!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 2:59 PM

मुंबई: देशभरातील 6 राज्यांमध्ये आता बर्ड फ्लूनं थैमान घातलं आहे. त्यात मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांचा त्यात समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या राज्यांमध्ये अद्याप कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर आलेलं नाही. या राज्यांमध्ये कावळे आणि बगळ्यांचा मात्र मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आणि राजधानी मुंबईतील चिकन व्यवसायाला मोठा धक्का बसलाय.(Bird flu rumors hit Mumbai poultry traders, shopkeepers)

चिकन आणि अंडी खाल्ल्यानं बर्ड फ्लू होतो, अशी अफवा पसरल्यानं मुंबईच्या चिकन उद्योगाला फटका बसलाय. मुंबईतील बऱ्याच चिकन दुकानदारांनी दुकानं साफ करायला सुरुवात केली आहे. दुकानांमधील रॅक रिकामे होत आहेत. कोंबड्या आणि अंड्यांची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. 200 रुपये किलो चिकन मुंबईत अवघ्या 70 ते 90 रुपयांना विकलं जात आहे. तरीही ग्राहक येत नसल्याचं दुकानदार सांगत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे राज्यातील पशु संवर्धन विभागानं परिपत्रक जारी करुनही लोकांमध्ये बर्ड फ्लूची मोठी अफवा पसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता पुन्हा एकदा पोल्ट्री व्यावसायिक आणि दुकानदारांच्या तोंडचं पाणी पळालंय. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाण्यात पक्ष्यांचा मृत्यू, गूढ वाढलं

ठाण्यातील घोडबंदर वाघबीळ परिसरात 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळेलले असताना आता त्याच भागात एक गिधाड मृतावस्थेत सापडले आहे. त्यासोबतच काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा पुन्हा मृतावस्थेत आढळले आहेत. पक्षांच्या या अचानक मृत्यूमुळे येथील नागरिक घाबरले असून पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून समोर आले नाही.

8 जानेवारीला 16 पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुन्हा बगळे आणि गिधाड मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. तसेच, मेलेले गिधाड अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे असल्यामुळे प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या:

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird flu rumors hit Mumbai poultry traders, shopkeepers

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.