मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार, भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन

'मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार', अशी टॅगलाईन घेत भाजपच्या वतीने 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे.

मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार, भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 6:45 PM

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. राज्य सरकारविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी आणि मंगळवारी (12 आणि 13 ऑक्टोबर)  राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Bjp Agitation For Demand Open the Temple and Women Security issue)

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात 12 ऑक्टोबर रोजी भाजप महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. तर 13 ऑक्टोबर रोजी मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली.

मदिरालये उघडण्यास परवानगी देणाऱ्या महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही. या विरोधात 13 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाईल. मंदिर बंद उघडे बार ,उद्धवा अजब तुझे सरकार, अशी टीका यावेळी उपाध्ये यांनी करत हीच भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे मंदिर पुन्हा उघडली जावीत, या मागणीसाछी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत, असं केशव उपाध्ये यांनी सांगितले.

“महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारच्या विरोधात 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे”, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले.

“महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीचे आम्ही स्वागत करतो. ज्यात प्रामुख्याने महिला अत्याचारसंदर्भात गुन्हा दाखल करण्यास (FIR)टाळाटाळ करणार्या पोलिस अधिकाऱ्यावर 166 A अंतर्गत कारवाई होणार आहे. बलात्काराचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं आता बंधनकारक असणार आहे. महिला बलात्कार प्रकरणात महत्वाचे ठरणारे फॉरेन्सिक पुराव्यांच्या संकलन, जतनची मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल”, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

भाजपच्या आंदोलनात चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी सांगितले. याचबरोबर मोदी सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ 12 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील सहभागी होणार आहेत, अशी माहितीही केशव उपाध्ये यांनी दिली.

(Bjp Agitation For Demand Open the Temple and Women Security issue)

संबंधित बातम्या

भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा, ब्राह्मण महासंघाची मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.