AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने राज ठाकरेंना कमळावर लढायला सांगितलं?, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट काय?; काय घडलं त्या बैठकीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून बोलत असताना अनेक मुद्द्याना हात घातला. त्यांनी यावेळी अमित शाह यांच्यासोबत झालेली भेटीबाबत ही सांगितले. मनसेला काय ऑफर देण्यात आली होती. पाहा काय म्हणाले राज ठाकरे.

भाजपने राज ठाकरेंना कमळावर लढायला सांगितलं?, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट काय?; काय घडलं त्या बैठकीत?
RAJ THACKERAY speech
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 8:33 PM

Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या मेळाव्यात आज अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेबाबत देखील खुलासा केला. राज ठाकरे म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा झाली. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला १९८५ला बसलो. त्यानंतर मी कधी चर्चेला बसलो नाही. दोन तू घे, चार मला दे. दोन तू घे. मला ते जमत नाही. माझ्याकडून होत नाही. मला ते जमणार नाही. मला सांगितलं. आमच्या निशाणीवर लढा. पण हे रेल्वे इंजिन आहे ना हे तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही.

चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही

चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही. दिल्लीला गेलेले ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं. जुन्या गोष्टी माहीत नसतात. आताच्या गोष्टीवर रेटायचं. १९८० साली बाळासाहेब ठाकरे, दिल्लीला इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटायला जायला काय प्रॉब्लेम आहे. मला अनेक लोक भेटायला येत असतात. मी काय समजायचं, अनेक लोक भेटत असतात. त्यात मोठेपणा कमीपणा कुठून आला.

शिंदे-फडणवीसांकडून ऑफर

वर्ष दीड वर्ष झाली. मुख्यमंत्री माझ्याशी बोलतात. आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र काही तरी केलं पाहिजे. म्हटलं शी… म्हटलं काय केलं पाहिजे? असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. फडणवीस आणि शिंदे सांगत होते एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे काय. मग त्यात विषय निघाले. म्हणून अमित शाह यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं. काय चाललंय मला समजायचं आहे. मग आमचं बोलणं झालं. इथे बोलणं झालं. निशाणीवर प्रकरण आलं. मग भेटीत सुरू झालं. एका भेटीत एका दौऱ्यात. लाव रे त्या व्हिडीओचं काय झालं.

१९८८ -८९ ला प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. शिवसेनेनंतर भाजपसोबत माझे अधिक संबंध आले. गडकरी, मुंडे, महाजन यांच्यासोबतचे संबंध राजकारण पलीकडचे होते. भाजपसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यादरम्यान गुजरात दौऱ्यावर गेलो. मोदी पंतप्रधान व्हावे ही गोष्ट मी आधी बोललो होतो. त्यांच्या पक्षातही हे कोणी बोललं नव्हतं.

मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.