मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

कालपासून राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. वानवडी बलात्कार प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांचं नाव घेताना, त्याच्यासारखे बलात्कारी मोकाट फिरतायत, त्यामुळे विकृतांना बळ येत असल्याची घणाघाती टीका केली आहे.

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या
चित्रा वाघ आणि मेहबूब शेख
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:11 PM

मुंबई : पुण्यातल्या वानवडी बलात्कार (Pune Wanwadi Rape Case) प्रकरणावर बोलताना भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) संतापल्या आहेत. राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये असा आरोप करत मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे. दुसरीकडे कालपासून राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांचं नाव घेताना, त्याच्यासारखे बलात्कारी मोकाट फिरतायत, त्यामुळे विकृतांना बळ येत असल्याची घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाल्यात चित्रा वाघ?

“पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय.  मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात. आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये.”

“एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की. मुख्यमंत्रीजी लक्ष द्या”, असं ट्विट करत वानवडी प्रकरणावर बोलताना त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरही निशाणा साधला.

पुण्यातील वानवडी भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यातील वानवडी भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 14 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे

प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) आणि राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणात या दोघा रेल्वे कर्मचाऱ्यांसह एकूण आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित 14 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.

दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यातला वाद नेमका काय?

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

आज सकाळपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत. एकंदरित या दोघांमध्ये येत्या काळात जोरदार संघर्षाची शक्यता आहे.

(BJP Chitra Wagh Tweet on pune Wanwadi Rape Case Slam Mahebub Shaikh)

हे ही वाचा :

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’

लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?, लंकेवरील टीकेचा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून समाचार

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.