अडकलेल्या कामगारांसाठी जनता किचन, मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था

लॉकडाऊनमध्ये अडकलेले कामगार, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी जनता किचन सुरु केले (Janta Kitchen Kandivali) आहे.

अडकलेल्या कामगारांसाठी जनता किचन, मोफत जेवण आणि राहण्याची व्यवस्था
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 3:53 PM

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस (Janta Kitchen Kandivali) वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय गावी जाण्यासाठी निघाले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेले कामगार, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी जनता किचन सुरु केले आहे. कांदिवली पश्चिम वॉर्ड क्रमांक 31 मध्ये हे जनता किचन सुरु करण्यात आले आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरात लॉक डाऊनमध्ये (Janta Kitchen Kandivali) अडकलेले कामगार, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी जनता किचनची सुरुवात केली आहे. या जनता किचनमध्ये गरीबांसाठी फ्री जेवण आणि राहण्याची सोय केली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 पर्यंत हे जनता किचन सुरु राहणार आहे. भाजप नगरसेवक कमलेश यादवने या किचनची सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे यात सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी या ठिकाणी तीन फूट अंतर ठेवून एक गोलाकार वर्तुळ केले आहे.

तसेच एका कुटुंबात 10 लोक असतील, तर एक व्यक्ती येऊनही तो संपूर्ण कुटुंबाचे जेवण घेऊन जाऊ शकतो. त्याशिवाय जो बेघर आहे किंवा मुंबई सोडून जाण्याचा विचार करत असल्यास त्यांना राहण्यासाठी जागाही उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे. मुंबईत आज पुन्हा 5 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त पुण्यात 1 आणि नागपूरमध्येही 2 कोरोना बाधित रुग्ण आढळला. आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 161 वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर (Janta Kitchen Kandivali) आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 63 सांगली – 24 पुणे – 20 (डिस्चार्ज 6) पिंपरी चिंचवड – 13 नागपूर 11 कल्याण – 6 नवी मुंबई – 6 ठाणे – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 पनवेल – 2 कोल्हापूर – 1 गोंदिया – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 पालघर – 1 रत्नागिरी – 1 गुजरात – 1 एकूण 160

संबंधित बातम्या :

Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....