रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोललं जात आहे. (Devendra Fadnavis Call Uddhav Thackeray)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. तसेच यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंबद्दल वाढत्या कोरोनाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. (Devendra Fadnavis Call CM Uddhav Thackeray to inquire Rashmi Thackeray Health)
रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोललं जात आहे.
रश्मी ठाकरेंना कोरोना
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना (Rashmi Thackeray) कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनतर त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.
आदित्य ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोनाची दुसरी टेस्ट नेगिटिव्ह येण्याची वाट पाहत आहेत. (Devendra Fadnavis Call CM Uddhav Thackeray to inquire Rashmi Thackeray Health)
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown | मुंबईत लॉकडाऊन करणार का? किशोरी पेडणेकर म्हणतात…