मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप, भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराने सर्व पदं सोडली

मीरा-भाईंदर शहरात राजकीय भूकंप आला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (BJP leader Narendra Mehta) यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप, भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराने सर्व पदं सोडली
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 10:10 PM

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे सर्वेसर्वा अशी ख्याती असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.

नरेंद्र मेहता यांनी एक व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली आहे. “माझ्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे मी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे”, असं त्यांनी व्हिडीओमध्ये (BJP leader Narendra Mehta) म्हटलं आहे.

मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपात दोन गट पडले आहेत. यामध्ये एक गट विद्यमान आमदार गीता जैन आणि दुसरा गट माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा आहे. वरिष्ठ नेत्यांकडून मेहता गटाला महापौर पदासाठी नाकारण्यात आलं. त्यामुळे ते नाराज झाले. नरेंद्र मेहतांनी रुपाली शिंदेंना महापौर आणि ध्रुवकिशोर पाटील यांना उपमहापौर बनवण्यासाठी सुचवलं होतं. परंतु पक्ष श्रेष्ठींनी आज दोन्ही नावं वगळून ज्योत्स्ना हसनाळे यांना महापौर आणि मदन सिंह आणि हसमुख गेहलोत यांना उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मेहता नाराज झाले आणि त्यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला.

नरेंद्र मेहता (BJP leader Narendra Mehta) हे 2002 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2007 मध्ये महापौर तर 2014 मध्ये आमदार असा त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. 2017 च्या मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवित यश मिळवून महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली. या संपूर्ण वाटचालीत ते कायम वादाच्या भोवर्‍यात सापडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेदेखील आरोप झाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. परंतू त्यानंतरही महापालिकेतल्या राजकारणावर त्यांची पकड कायम होती. येत्या 26 फेब्रुवारीला होत असलेली महापौर निवडणूक जिंकून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र निवडणूक होण्याआधीच मेहता यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयाचे आता महापौर निवडणुकीवर कोणते परिणाम होतात हे येत्या 26 तारखेला स्पष्ट होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.