प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…? चित्रा वाघ यांचा सवाल

याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Chitra wagh on Mansukh Hiren Death Case)

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना...? चित्रा वाघ यांचा सवाल
भाजप नेत्या चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 9:54 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Chitra wagh comment on Mansukh Hiren Death Case)

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले.  कधी कुणी सेलीब्रिटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन…प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला

दरम्यान, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या गाडीचा शोध पोलिसांनी लावला. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. (Chitra wagh comment on Mansukh Hiren Death Case)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

मी आणि माझे कुटुंब असे होईल याचा कधी विचारही करु शकत नाही. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत तक्रार केली होती. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. त्यांना कालही बोलवण्यात आले. ते काल गेले. पण रात्री घरी परतले नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीवरुन तावडे म्हणून एकाचा फोन आला होता. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.

जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली.  (Chitra wagh comment on Mansukh Hiren Death Case)

संबंधित बातम्या : 

Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

Mansukh Hiren : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय : गृहमंत्री अनिल देशमुख

Who is Mansukh Hiren : मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.